भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १,५०० विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप

सायली अगावणे या कथक आणि वेस्टर्न नृत्यांगना असून डाऊन सिंड्रोम तसेच शारीरिक व मानसिक अडचणींवर मात करत त्यांनी स्वतःच्या जिद्दीने विशेष मुलांसाठी प्रेरणादायी कार्य उभे केले आहे.

  • Written By: Published:
bhausaheb rangari

Bhausaheb Rangari Distribute School Books : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने क्रांतीसूर्य भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ दापोली, भीमाशंकर, सातारा, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना होणार आहे.

या कार्यक्रमात जागतिक विक्रमवीर आहान मोदी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सायली नंदकिशोर अगावणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. अवघ्या ५ वर्षे ८ महिन्यांच्या वयात आहान मोदी याने २ मिनिटे ४९ सेकंदांत १९७ राष्ट्रध्वजांची नावे अचूक ओळखून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच तो जगातील सर्व देश, त्यांच्या राजधान्या आणि नकाशावरील त्यांचे स्थान अचूक सांगू शकतो.

सायली अगावणे या कथक आणि वेस्टर्न नृत्यांगना असून डाऊन सिंड्रोम तसेच शारीरिक व मानसिक अडचणींवर मात करत त्यांनी स्वतःच्या जिद्दीने विशेष मुलांसाठी प्रेरणादायी कार्य उभे केले आहे. त्या स्वतःसारख्या विशेष मुलांना नृत्य आणि योगाचे प्रशिक्षण देतात. ट्रस्टच्या वतीने आहान मोदी आणि सायली अगावणे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास संजय घनाटे (उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा, तेलंगणा), विजयकुमार सिंग (निवृत्त निबंधक, एनआयटी, कोलकाता), श्रीमती शिखा दरबारी (निवृत्त आयकर आयुक्त, नवी दिल्ली) आणि राम सरोदे (अध्यक्ष, युवा मोर्चा, भावसार समाज) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, सचिव दिलीप आडकर, विश्वस्त मिलिंद डफळ तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us