खा. गिरीश बापटांनी रवींद्र धंगेकरांना नेमका काय कानमंत्र दिला?

खा. गिरीश बापटांनी रवींद्र धंगेकरांना नेमका काय कानमंत्र दिला?

पुणे : कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने (BJP) प्रचंड मेहनत घेतली होती. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची रॅली आणि रोड शोचं आयोजनही करण्यात आलं होतं. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) पराभूत करण्यासाठी खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनाही भाजपने मैदानात उतरवलं होतं. नाकात ऑक्सिजनच्या नळकांड्या घालून बापट यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार केला. मात्र, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर धंगेकर यांनी बापट यांची भेट घेतली होती. यावेळी बापट यांनीही चांगले काम करण्याचा सल्ला धंगेकर यांना दिल्याचं रविंद्र धंगेकरांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

2009  ला गिरीश बापटांच्या विरोधात धंगेकरांनी निवडणूक लढवली होती. तरीही त्यांनी बापटांची भेट घेतली, याविषयी बोलतांना धंगेकरांनी सांगितलं की, आपली संस्कृती आहे की, विरोधक म्हणजे, शत्रू नाही. त्यामुळे गिरीश बापटांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं बोलल्या जाते आहे. खासदार बापट यांनीही धंगेकर यांना चांगलं काम करण्यासंदर्भात मोलाचा सल्ला दिला.

चांगली मेहनत घेतल्यामुळे तुला कसब्यात चांगलं फळ मिळाले आहे. योग्य पद्धतीने कामाचे नियोजन कर आणि त्या कामाच पाठपुरावा करत राहा, तुला पुढंही यश निश्चितपणे मिळेल, असा आशिर्वाद बापटांनी दिला. दरम्यान, धंगेकर यांनी सांगितलं की, भाजप वेगळं राजकारण करत आहेत. मात्र, बापटांनी मला मदत करेन म्हणून सांगितलं. काही अडचण आली आणि माझी गरज भासली तर मी तुला मदत करण्यास सदैव तयार आहे, असं बापट यांनी सांगितल्यां धंगेकर म्हणाले.

Vijay Shivtare : ‘सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं’

दरम्यान, कसब्यातील पोटनिवडणुकीत सुरुवातीपासूनच वेळोवेळी स्वत:चे वेगळेपण दाखवून देणाऱ्या रवींद्र धंगेकर यांनी विजयानंतरही आपले पाय अजूनही जमिनीवरच असल्याचे दाखवून दिले. एवढेच नव्हे तर एरवी अटीतटीच्या लढतीनंतर राजकीय उमेदवारांमध्ये कटुता निर्माण होते. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी आपल्या कृतीने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. महाराष्ट्रात दुर्मिळ झालेली निकोप राजकीय संस्कृती काय असते, हे रवींद्र धंगेकर यांनी दाखवून दिले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube