फॅब्रिकेशन व्यवसायिकाकडून दृश्यम स्टाईल खून; पत्नीला संपवलं, भट्टीत जाळून राखही नदीत फेकली
Drishyam style murder पद्धतीने पुण्यातील वारजे परिसरामध्ये एका फॅब्रिकेशन व्यावसायिकाने चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवलं आहे.
Fabrication businessman commits Drishyam style murder Kills wife, burns her in a furnace and throws ashes into the river : गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढला आहे. ज्यामध्ये पती-पत्नीने एकमेकांना धक्कादायक पद्धतीने संपवल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. यामध्ये अशीच एक घटना पुण्यातील वारजे परिसरांमधून समोर आले आहे यामध्ये एका फॅब्रिकेशन व्यावसायिकाने चारित्र्याच्या संशयातून पत्नीला दृश्यम स्टाईलने संपवलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील वारजे परिसरामध्ये समीर जाधव यांचा फॅब्रिकेशन व्यवसाय आहे तर त्यांच्या पत्नी अंजली जाधव या खाजगी शाळेत शिक्षिका होत्या. मात्र चारित्राच्या संशयातून समीरने पत्नी अंजलीला दृश्यम स्टाईल पद्धतीने संपवत स्वतःच पोलिसांमध्ये पत्नी बेपत्ता असल्याचे तक्रार दिली होती. प्रकरणाचे धागेदोर सापडत नव्हते. पण अखेर पोलिसांना मिळालेल्या माहितीमध्ये समीरचा फॅब्रिकेशन व्यवसाय असून त्याला त्याच्या पत्नीचे एका व्यक्तीशी प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय होता. व्हाट्सअप चॅटिंगवरून देखील त्याने आरोप केले होते आणि त्यांच्यात वादही झाले होते. यातूनच त्यांने पत्नीच्या खुनाचा कट रचला.
फॅब्रिकेशन व्यवसायिकाकडून दृश्यम स्टाईल खून
यामध्ये त्याने दृश्यम स्टाईल पद्धतीने नियोजन केलं. मुंबई-बंगळूर महामार्गावरील खेड-शिवापूर परिसरात गोगलवाडी फाटा शिंदेवाडी या ठिकाणी एक गोडाऊन आठ हजार रुपये भाड्याने घेतलं. तर 26 ऑक्टोबर रोजी त्यांनी पत्नीला बाहेर घेऊन जाण्यासाठी गाडीने फिरायला नेले. यावेळी मरीआई घाटामध्ये या दोघांनी फेरफटका मारला होता. याचवेळी परतल्यानंतर भेळ खात असताना समीरने अंजलीचा गळा दाबला आणि तिला संपवले. तर याच गोडाऊनमध्ये अगोदरच त्यांनी भट्टी तयार करून ठेवले होते. या भट्टीत अंजलीचा मृतदेह जाळून खाक केला आणि भट्टी थंड होताच राख जवळच्या नदीत फेकून दिली. तसेच त्यानंतर ही भट्टी आणि इतर सर्व साहित्य देखील त्याने स्क्रॅप करून टाकलं. दरम्यान हा खून करण्यापूर्वी समीरने दृश्यम हा चित्रपट चार वेळा पाहिला होता. त्यामुळे त्याने स्वतःच्या बचावाचा संपूर्ण प्लॅन बनवलेला होता. यासाठीच त्यांनी दोन दिवसांनी पोलीस वारजे पोलीस ठाण्यात जाऊन शिंदेवाडी अजून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली.
