एफडीएचा दणका : पुण्यातील चार हॉटेल्सचे परवाने रद्द; संभाजीनगरमध्ये जेलबीसाठी सरकीच्या तेलाचा वापर
FDA Tukaram Munde: गेल्या दोन दिवसांत एफडीएने 68 हॉटेल, रेस्टारंट, धाबा येथे तपासणी करण्यात आली आहे. त्यात 14 जणांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे. 12 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
FDA Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाची (FDA) राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत एफडीएने 68 हॉटेल, रेस्टारंट, धाबा येथे तपासणी करण्यात आली आहे. त्यात 14 जणांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे. 12 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यात पुण्यातील आणि संभाजीनगरमधील नामांकित हॉटेल्सचा समावेश आहे.
NEET-UG 2024 : नीट पेपर लिक प्रकरणी संजीव मुखियाला क्लिनचीट…सीबीआयला कोणताही पुरावा मिळाला नाही
मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कॅन्टिनच्या कमल केटर्स प्रायव्हेट लिमिटेचे अन्न नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात या कॅन्टिनला सुधारणा नोटीस बजाविण्यात आली होती. परंतु कॅन्टिनकडून कोणताही लेखी खुलासा सादर करण्यात आला नव्हता. 22 जुलै रोजी पुन्हा कॅन्टिनची तपासणी करण्यात आली. त्यात त्रुटी आढल्याने अन्न नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आला आहे. पुणे विभागातील सहा हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. त्यात जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कामशेत मावळ येथील टोनी दा दाबा, पुणे मार्केटयार्डमधील हॉटेल लोकप्रिय, मार्केटयार्डमधील जय सदगुरू इराणी चहा अॅंड स्नॅक्स सेंटर, फाउंटन प्युअर व्हेज (आळेफाटा, पुणे) या हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
राजकुमार हिरानी यांच्या ‘प्रीतम अँड पेड्रो’मधून देशभरातील हजारो शाळांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती
संभाजीनगरमधील उत्तम उपहार गृहावर कारवाई
छत्रपती संभाजीनगरमधील गुलमंडी रोड येथील प्रसिद्ध उत्तम उपहार गृहावर कारवाई केली आहे. या उपहार गृहाच्या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या अनियमितात आढळून आल्या आहेत. या अपहार गृहाने परवाना चुकीच्या पद्धतीने मिळविल्याचे उघडकीस आले आहे. तसेच येथील प्रसिद्ध इमरती जिलेबी व इतर मिठाईमध्ये सॅथेटिक फूड कलर टारजिझचा वापर केल्याचे आढळले आहे. या वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रंगाचे प्रमाण नोंदविण्यासाठी आवश्यक मोजमापाची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती. या उपहारगृहात अन्नपदार्थ तळण्यासाठी सरकीच्या तेलाचा वारंवार वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.