पहाटेच्या थंडीत फिक्की फ्लोमध्ये नऊ हजारांहून अधिक जण धावले !

  • Written By: Published:
पहाटेच्या थंडीत फिक्की फ्लोमध्ये नऊ हजारांहून अधिक जण धावले !

पुणेः महिला सक्षमीकरणासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणाऱ्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) फिक्की फ्लोच्या पुणे (Pune) चॅप्टरतर्फे ६ व्या फिक्की फ्लोला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेत तब्बल नऊ हजारांहून अधिक जण सहभागी झाले होते. अर्ध मॅराथॉनमध्ये खुल्या गटात निशू कुमार याने प्रथम, सॅम्टन इझर याने दुसरा तर प्रथमेश शिंदे याने तिसरा क्रमांक पटकावला.

निशू कुमार यांनी १ तास १८ मिनिटे व १५ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. सॅम्टन यांनी १ तास २१ मिनिटे व ३१ सेकंदात तर प्रथमेश यांनी १ तास २२ मिनिटे व ११ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करीत यश मिळवले. विविध चार गटांमध्ये झालेली ही आंतरराष्ट्रीय मॅराथॉन मगरपट्टा सिटी येथे रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. फिक्की फ्लो नॅशनलच्या सह कोषाध्यक्षा अजिता रेड्डी , फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रेखा सतीश मगर, व्हीआयपी सुरक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, डेप्युटी कमांडंट व एनडीएचे चीफ इन्स्ट्रक्टर मेजर जनरल संजीव डोगरा आदी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला.

सकाळी साडेपाच वाजता हाफ मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ झाला, त्यानंतर अनुक्रमे दहा किलोमीटर, पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर व साडी रन साठी उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवली. हाफ मॅरेथॉन- २१ किलोमीटर- वय वर्षे चाळीस वर्षावरील पुरूष गटात गौरव यांनी प्रथम, कृष्णा सिरोथा यांनी व्दितीय तर कृष्णा पॉल यांनी तृतीय क्रमांक पटकावला. वय वर्षे चाळीसवरील महिला गटात हेमांगी गोडबोले यांनी प्रथम, प्रसन्ना प्रिया यांनी व्दितीय तर रितू चौधरी यांनी तिसरा क्रमांक पटकावला. वर्षे चाळीस खालील महिला गटात वेदांशी जोशी यांनी प्रथम, क्लेरी जॉन्सन यांनी व्दितीय तर सौम्या पिल्लई यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
१० किलोमीटर – पुरूषांच्या खुल्या गटात – नील पुनेकर, निखील तिवारी याने व्दितीय तर विष्णु चंद्रन यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

महिल्यांच्या खुल्या गटात विजेते

अर्चना आढाव यांनी प्रथम, ज्योती ठाकरे यांनी व्दितीय व नेहा दळवी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
वय वर्षे चाळीसवरील पुरूष गटात – रमेश चिंचवलकर यांनी प्रथम, अतुल गोडबोले यांनी व्दितीय तर प्रदीप गांगर्डे यांनी तृतीय क्रमांक पटकावला
. वय वर्षे चाळीसवरील महिला गटात अंजू चौधरी, सायली गंगाखेडकर यांनी व्दितीय तर अर्चना ओक यांनी तृतीय क्रमांक पटकावला.फिक्की नॅशनलच्यासह कोषाध्यक्षा अजिता रेड्डी , फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रेखा सतीश मगर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, व्हीआयपी सुरक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, डेप्युटी कमांडंट व एनडीएचे चीफ इन्स्ट्रक्टर मेजर जनरल संजीव डोगरा, वर्षा तलेरा, संगीता ललवाणी आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषक वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या आयोजनात पाठबळ दिलेल्या मगरपट्टा सिटी ग्रुप, एचडीएफसी बँक, अॅमडॉक्स, तमिळनाडू मर्चंटाईल बँक, इटॉन, जेट सिंथेसिस, व्होल्टास, जेएलएल कंपन्यांच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी पारितोषक वितरण समारंभात उपस्थितांशी संवाद साधताना फिक्की नॅशनलच्या सह कोषाध्यक्षा अजिता रेड्डी यांनी सहाव्या पुणे फ्लो भव्य मॅरेथॉनच्या आयोजनासाठी पुणे चॅप्टरचे अभिनंदन केले व फिक्की फ्लो महिलांच्या सक्षमीकरणासाठी चालवत असलेल्या विविध कार्यक्रम व उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करीत फिक्की फ्लोच्या अनेकविध कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रेखा सतीश मगर यांनी मॅरेथॉनच्या उपक्रमातून जमा झालेला निधी कृषी व कृषी पूरक छोट्या उद्योगात काम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्याच्या कौशल्य विकासासाठी प्राधान्याने उपयोगात आणला जाणार असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी पाठिंबा दिलेल्या सर्वांचे व स्पर्धकांचे आभार मानले.

विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश हे म्हणाले की, फिक्की फ्लोच्या या व अशा विविध उपक्रमात आपण सहभाग घेतल्यास महिला सक्षमीकरणासाठी ती मोठी मदत ठरले असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, शरीर हे सर्व कर्तव्य पूर्ण करण्याचे प्रमुख साधन आहे. जे शरीर स्वस्थ तिथे, मन स्वस्थ असतो आणि वास करणारा आत्मा स्वस्थ असते हे अनुभवाने सांगत मॅराथॉन म्हणजे स्वतःला आव्हान देता येईल अशी आगळी वेगळी स्पर्धा आहे. अशा उपक्रमात सहभाग घेत, प्रत्येक वेळी किलोमीटरचे नवनवीन टप्पे पादाक्रांत करा.

साडी रनने आणली रंगत

या मॅराथॉनमध्ये साडी रनचा एक विशेष गट ठेवण्यात आला होता. त्यात सुमारे दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. विशेषतः महाराष्ट्रीयन नऊवारी, पंजाबी, गुजराथी अशा विविध राज्यातील साडीची वेशभूषा करून महिला सहभागी झाल्या होत्या. त्यात काही चिमुकल्या मुलींनी देखील नऊवारी साडी नसलेली दिसली.

सोनालीने ठेका धरला अप्सरा आली गीतावर
पारितोषक वितरण समारंभात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने उपस्थितांच्या आग्रहास्तव नटरंग चित्रपटातील अप्सरा आली इंद्रपूरीतून खाली… या तिच्या लोकप्रिय गीतावर ठेका धरला. उपस्थित मॅरेथॉनमधील सहभागाबाबत स्पर्धकाचे कौतुक करीत आपणही पुढील वर्षी अशा स्पर्धेत सहभागी होणार असल्याचा मनोदय तिने व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube