इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; नापास झालात तरी मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश
Admission Next Class In Engineering even after failing : अभियांत्रिकीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखील नापास झाल्यानंतरही पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. जसा दहावीच्या वर्गात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऐटेकेटीच्या माध्यमातून अकरावीला प्रवेश मिळतो. याच धर्तीवर आता त्यासंदर्भातील (Engineering ) आदेश सोमवारी (ता. १०) उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढला आहे.
देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
अभियांत्रिकी शिक्षण घेताना जर एखाद्या विद्यार्थ्याचा पहिल्या वर्षाचे विषय राहिले तर त्याला तृतीय वर्षाला प्रवेश मिळत नाही. तीनपेक्षा जास्त विषय (थेअरी व प्रॅक्टिकल) हेडमध्ये तो विद्यार्थी अनुत्तीर्ण नसावा, अशी अट आहे. तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यास पहिल्या वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण व्हावे लागतील. अंतिम वर्षात प्रवेश घेण्यासाठी प्रथम व द्वितीय वर्षातील अनुत्तीर्ण विषयांत त्यांना पास व्हावे लागणार आहे.
दरम्यान, कोरोनानंतर विद्यार्थ्यांची अभ्यासाची गोडी कमी होऊन सहज पास होण्याची सवय लागल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाला असा निर्णय घ्यावा लागल्याची टीका शिक्षणतज्ज्ञांकडून होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांनी कॅरिऑन या पर्यायाचा विचार न करता अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून पुढे चांगली नोकरी, रोजगाराची संधी त्यांना मिळेल, असे आवाहन देखील केले जात आहे
शासनाच्या आदेशानुसार आता
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (रायगड) यांच्यासाठी हा आदेश लागू असणार. प्रथम वर्षात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रासाठी व द्वितीय वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्रात मिळणार प्रवेश पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची पात्रता ही सम सत्र २०२३-२४ (म्हणजे उन्हाळी परीक्षा २०२३-२४) च्या परीक्षांच्या निकालाऐवजी विषम सत्र २०२४-२५ (म्हणजे हिवाळी परीक्षा २०२४-२५) च्या निकालावर ठरवावी
पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५च्या विषम (हिवाळी) व सम (उन्हाळी) सत्राच्या परीक्षा एकत्रित सम (उन्हाळी) सत्राच्या परीक्षांसोबत घ्याव्यात, वरच्या वर्गातील प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या विषम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल आणि यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडे आवश्यक हमीपत्र भरून द्यावे लागेल