अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांच्या संधीचं सोन! विश्‍वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयात यशस्वी प्लेसमेंट ड्राइव्ह

अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांच्या संधीचं सोन! विश्‍वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयात यशस्वी प्लेसमेंट ड्राइव्ह

placement drive at Ahilyanagar येथील विश्‍वभारती अकादमी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात क्वेस कॉर्प लिमिटेड आणि बजाज टेंपो लिमिटेड (पुणे व छत्रपती संभाजीनगर) यांच्या सहकार्याने डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी 4 फेब्रुवारी 2025 ला भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला होता. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये मुलाखतीसाठी निवड जलेल्या ३४ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या, त्यापैकी ११ विद्यार्थ्यांची निवड झाली आणि त्यांना त्वरित नोकरीच्या संधी मिळाल्या.

रिलायन्स साम्राज्याचा कारभार पाहणारी नवी अधिकारी; कोण आहे गायत्री यादव?

या भरती प्रक्रियेसाठी क्वेस कॉर्प लिमिटेड आणि बजाज टेंपो लिमिटेड यांच्या वतीने एचआर एक्झिक्युटिव्ह अंकिता आगवणे आणि वरिष्ठ भरती अधिकारी सागर दवणे उपस्थित होते. या प्लेसमेंट ड्राइव्हचे यशस्वी आयोजन मा. प्राचार्या वैशाली ढोंगडे, डीन आर.डी. साखरवडे, तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. व्ही.एम. मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच टीअँडपी समन्वयक श्री. रोहित यादव, श्वेता जगताप, तसेच सहाय्यक कर्मचारी रूपाली विधाते, अलीना बेग आणि पूजा पाळवे यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात शेत जमिनीच्या वापरासाठीची ‘NA’ अट रद्द

यासोबतच, या प्लेसमेंट ड्राइव्हच्या संपूर्ण आयोजनात सहा.प्रा. व्ही.एम. मोरे सर यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांना योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी कंपन्यांसोबत सातत्याने समन्वय साधला आणि प्लेसमेंट प्रक्रियेसाठी योग्य नियोजन केले.

या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी:

इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी: 1. भवरे आदेश,2. जाळे गौरव, 3. भपकर आदित्य, 4. फसाळे प्रतीक, 5. खेडकर किशोर, 6. मुकेश केदार, 7. शेख रियान, 8. गायकवाड कुणाल, 9. खांडवे ऐश्वर्या,

मेकॅनिकल अभियांत्रिकी: 1. बोठे सूरज, 2. पवार अथर्व,

महाविद्यालय विद्यार्थ्यांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जात असून, विश्‍वभारती अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube