Crime : लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; बीटेकच्या विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहाथ पकडलं

  • Written By: Published:
Crime : लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; बीटेकच्या विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहाथ पकडलं

Bengaluru Engineering College Hidden Camera : कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महिला स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडला. बीटेकच्या एका विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. तो फोन व्हेंटिलेटरमध्ये ठेवून शेजारील टॉयलेटमध्ये लपून रेकॉर्डिंग करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलीने फोन पाहिला. ती पटकन बाहेर आली आणि शेजारील शौचालयाला कुलूप लावलं, ज्यामध्ये विद्यार्थिनी लपली होती. मुलीने आरडाओरड करून आणखी लोकांना बोलावलं. यानंतर आरोपीला ओढत बाहेर काढून मुख्याध्यापकांच्या चेंबरमध्ये बंद करण्यात आलं.

Bharatpur Police Crime : लष्करी अधिकाऱ्याच्या वधूबरोबर पोलीस ठाण्यात घृणास्पद कृत्य

फोनमधून 15 मिनिटांचं रेकॉर्डिंग

पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. 21वर्षीय कुशल गौडा असं आरोपीचं नाव आहे. तो चिक्कागोल्लारहट्टी, मगडी रोड येथील रहिवासी असून संगणक विज्ञान 7व्या सेमिस्टरचा विद्यार्थी आहे. त्याच्या फोनमधून 15 मिनिटांचं रेकॉर्डिंगही सापडलं. पोलीस म्हणाले की, कॉलेज व्यवस्थापनही जबाबदार असून सीसीटीव्ही काम करत नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅमेरा पाहून मुलीने सकाळी 10.45 वाजता अलार्म वाजवला होता. म्हणजेच सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी मोबाईल फोन रेकॉर्डिंगवर ठेवला होता. कॉलेज व्यवस्थापनालाही दोषी धरलं पाहिजे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिला स्वच्छतागृहाजवळ बसवलेले सीसीटीव्ही काम करत नाहीत. याशिवाय स्वच्छतागृहाजवळ एकही महिला परिचर तैनात नव्हती.

दीड महिन्यात दुसरी घटना

पोलिसांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध कलम 77, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही त्याने असे केले आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्याच्या फोनचा डेटा तपासला जात आहे. बंगळुरूमधील सार्वजनिक स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडण्याची दीड महिन्यात ही दुसरी घटना आहे. याआधी 10 ऑगस्ट रोजी एका प्रसिद्ध कॉफी शॉपच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडला होता.

श्रीलंकेत उलटफेर! चीनसमर्थक दिसानायके होणार राष्ट्रपती; विक्रमसिंघेंना धक्का

बीईएल रोडवरील थर्ड वेव्ह कॉफी आउटलेटमध्ये ही घटना घडली होती. कॉफी शॉपच्या वॉशरूममधील टॉयलेट शीटसमोरील डस्टबिनमध्ये कॅमेरा लपवला होता. दोन तास रेकॉर्डिंग चालू होते. एका महिलेने कॅमेरा पाहिला. फोन फ्लाइट मोडवर होता, जेणेकरून कॉल किंवा मेसेज आल्यावर कोणत्याही प्रकारचा आवाज येणार नाही. या प्रकरणी कॅफेच्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या