विरोधकांचं सोडा सत्ताधारीही नापास! पुण्याचे खासदार अन् मंत्री मोहळ यांना किती निधी मिळाल अन् किती खर्च झाला?
सरकारमध्ये मोहळ हे मंत्री असूनही त्यांचा विकास निधी खर्च करण्याचा वेग आणि काम पूर्ण करण्याचा वेग पाहिला तर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
मागील काही दिवसांपासून विरोधी (MP) खासदारांना सत्ताधाऱ्यांकडून विकास निधी मिळत नाही. काम करता येत नाहीत असं सांगितलं जातं. दरम्यान, अशीच कारण सांगून शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. या सगळ्या चर्चा सुरू असताना आता या सहा खासदारांसह इतरही अनेक खासदारांना किती खासदार निधी मिळतो आणि ते किती खर्च करतात हे आकडेवारीसह समोर आलं आहे. त्यामध्ये आपण आज पुण्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांना किती निधी मिळाला आणि किती खर्च झाला हे पाहणार आहोत.
खासदार निधी खर्चात नीलेश लंकेंचेही हात रिकामे ! 14.70 कोटी मिळाले पण खर्च किती ?
मंत्री मोहळ यांनी मतदारसंघातील 74 विकास कामांची शिफारस केली होती. त्यातील 74 कामं सुरू आहेत. परंतु, एकही काम पूर्ण झालेलं नाही. यासाठी मोहळ यांना निधी मिळाला 14 कोटी 7 लाख इतका. त्यामध्ये त्यांनी खर्च केला आहे 1 कोटी 19 लाख 96 हजार 657 इतका. टक्केवारीत म्हटलं तर (8.2%) इतका. म्हणजे 14 कोटीमधून त्यांनी फक्त जेमतेम एक कोटीच खर्च केले आहेत. त्यांचा उरलेला निधी आहे 13 कोटी, 50 लाख, 3343 इतका. आता त्यांच्याकडं 3 वर्ष आहेत. दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत. या पुढील काळात ते हा निधी कधी आणि कशासाठी खर्च करतात हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान, विरोधी खासादारांना निधी मिळत नाही, त्यांची काम होत नाहीत अशी तक्रार केली जाते. त्या तक्रारीतून नुकतच सहा खासदारांनी बंडही केलं. परंतु, सत्ताधारी खासदार आणि मंत्री असतानाही ही अवस्था आहे तर खरच विकास कामं आणि निधी ही खासदारांची समस्या आहे का? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. त्याचबरोबर सध्या डबल इंजिन सरकारमध्ये मोहळ हे मंत्री असूनही त्यांचा विकास निधी खर्च करण्याचा वेग आणि काम पूर्ण करण्याचा वेग पाहिला तर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
मुरलीधर मोहळ खासदार पुणे
निधी मिळाला – 14.7 कोटी
खर्च केला – 1 कोटी 19 लाख, 96 हजार 657. (8.2%)
शिल्लक रक्कम – 13 कोटी, 50 लाख, 3343