पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात; विमानसेवेबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ यांची मोठी माहिती…

plane crashes at Pune airport . त्यामुळे धावपट्टी काही तासांसाठी बंद होती. त्यावर केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.

Plane Crashes At Pune Airport

Indian Air Force plane crashes at Pune airportUnion Minister Mohol’s big information regarding air services : पुणे विमानतळावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला आहे. त्यामुळे पुणे विमानतळाची धावपट्टी काही तासांसाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. त्यावर आता नागरी व विमान उड्डाण वाहतूक केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज 18 एप्रिल 2026 च्या सकाळी त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करत माहिती दिली आहे.

कशी असणार वैशाख महिन्याची सुरूवात? जाणून घ्या बाराही राशींचं आजचं राशी भविष्य

दरम्यान हा अपघात किरकोळ असल्याने सुदैवाने कोणत्याही विमान कर्मचाऱ्याला दुखापत झाले नसून सर्वजण सुरक्षित आहेत. त्याचबरोबर नागरी मालमत्तेचे देखील नुकसान झालेले नाही. मात्र धावपट्टी पूर्णपणे मोकळी करून सामान्य विमानसेवा सुरू करण्यासाठी काही तासांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. तसेच काही दुरुस्ती देखील सुरू असल्याने ही विमानसेवा पुन्हा सुरू होण्यास पाच तास लागतील. असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान याबाबात नागरी व विमान उड्डाण वाहतूक केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. ते म्हणाले की, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे कामकाज सध्या भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या घडलेल्या घटनेमुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

हर्षदा खानविलकर-सुनील बर्वेंची इच्छा पूर्ण! प्रिया अन् उमेश कामतच्या नाटकात झळकणार एकत्र

सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.या संदर्भात सर्व संबंधित विमान कंपन्यांना सूचित करण्यात आले असून, धावपट्टी पूर्ववत करून नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे ५ तासांचा कालावधी लागू शकतो.परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी मी स्वतः विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. असं ट्विट त्यांनी या अपघातानंतर केलं होतं.

त्यानंतर आज 18 एप्रिल 2026 च्या सकाळी त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करत माहिती दिली आहे की,  भारतीय हवाई दलाच्या (IAF) विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे विमानतळावरील धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती.त्यानंतर धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले असून, संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.विमान उड्डाणे सकाळी 7:30 वाजल्यापासून पुन्हा सुरू होतील आणि आगमन उड्डाणे सकाळी 8:00 वाजल्यापासून सुरू होतील.पुण्यातील हवाई वाहतूक दिवसभरात हळूहळू पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.

follow us