Solar Mission : आदित्य L1 च्या यशात पुणेकरांचाही खारीचा वाटा; तयार केले SIUT payload

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 09 02T135916.515

पुणे : चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रेक्षेपणानंतर आज (दि.2) इस्त्रोचे आदित्य L1 (Aditya L1) यान यशस्वीपणे सूर्यकडे झेपावले आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अशाप्रकारे अंतराळात यान पाठवणारा भारत हा जगातील तिसरा देश बनला आहे. सूर्याकडे यशस्वीपणे झेपावलेल्या आदित्य L1 यानाच्या निर्मितीमध्ये पुणेकरांचाही खारीचा वाटा आहे. सूर्याकडे झेपावलेल्या आदित्य L1मध्ये SIUT payload पुण्यातील आयुका संस्थेतील (IUCAA Pune) वैज्ञानिकांनी बनवले आहे.

India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’

आदित्य L1 या यानामधील SIUT payload पुण्यातील आयुकामध्ये विकसित करण्यात आले आहे. याचा मुख्य वापर अल्ट्रा- व्हायोलेट जवळील इरॅडियन्स व्हेरिएशन्स मोजण्यासाठी केला जाणार आहे. सौर अल्ट्रा-व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपच्या म्हणजेच SUIT च्या मदतीने सौर प्रतिमा तयार केली जाणार आहे.

सूर्यमोहिमेचं बजेट किती?
या मोहिमेसाठी मोठा खर्च तर झाला आहेच पण जगातील अन्य देशांच्या तुलनेत हा खर्च कमीच आहे. याआधी भारताने चंद्र मोहिम यशस्वी केली होती. त्याचा खर्च एक हॉलीवूड चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी होता.

Uddhav Thackeray : “मला देशाचा नेता व्हायचं नाही”; पंतप्रधानपदाच्या रेसमधून ठाकरेंची माघार

सूर्य मोहिमेसाठी किती खर्च (Aditya L1 Budget) आला याची माहिती इस्त्रोने (ISRO) अद्याप दिलेली नाही. पण सरकारने लोकसभेत सांगितले होते की सोलर मिशनसाठी 378.53 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये लाँचिंगसाठी येणारा खर्च समाविष्ट केलेला नाही. या बजेटसह हे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त मिशन असेल. नासाचे (NASA) स्टीरियो (Stereo) स्पेसक्राफ्ट ऑक्टोबर 2006 मध्ये लाँच करण्यात आले होते. या मोहिमेचे बजेट 55 कोटी डॉलर म्हणजेच 4 हजार 549 कोटी रुपये इतके जास्त होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube