Kasba By Election : नानांचं कुठं मनावर घेताय.., चित्रा वाघ यांनी काढला चिमटा

Kasba By Election : नानांचं कुठं मनावर घेताय.., चित्रा वाघ यांनी काढला चिमटा

पुणे : नाना पटोले यांचं कुठं मनावर घेताय, त्यांच्यामागे मोठा व्याप असून त्या व्यापातून ते आरोप करत असल्याचा चिमटा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काढला आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज चित्रा वाघ पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा जोरदार प्रचार केला असून मतदारसंघातील मतदारांचे प्रश्न समजून घेतले आहेत. मतदारसंघात प्रचारफेरीदरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना वाघ म्हणाल्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं कुठं मनावर घेता. पटोलेंच्यामागे किती मोठा व्याप आहे. त्या व्यापातून त्यांच्याकडून असे उद्गार निघाले असतील, असं वाघ म्हणाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना बोलावून दमदाटी केल्याचा आरोप पटोले यांनी केला होता. त्यावर वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Thackeray Vs Shinde : निवडणूक आयोगाचा निर्णय, बहुमत, राज्यपाल… कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केला?

तसेच महाविकास आघाडीच्या हातून सत्ता गेल्याने ते सध्या दबावाखाली आहेत. अनेक मोठ-मोठ्या घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांचं डोकं चालत नसल्याचीही टीका त्यांनी केलीय. दरम्यान, विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नसून कसब्यातील मतदारराजा हा भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे कसब्यात पुन्हा एकदा कमळच फुलणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

चीनच्या कर्जात पाकिस्तान बुडाला ? महागाई शिखरावर

आम्ही कोणतीही निवडणूक गांभीर्याने घेतो. ग्रामपंचायत असो वा विधानसभा, निवडणुकीत भाजपचे सर्वच वरिष्ठ नेते प्रचारासाठी मैदानात उतरत असतात. प्रचारामध्ये मोठे नेते मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करत असतात. केंद्रीय मंत्री अमित शहादेखील त्यासाठी कसब्यात आले होते. भाजपचे सर्वच नेते आवडीने प्रचार करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय.

Shambhuraj Desai यांची खोचक टीका : ‘मातोश्री’त बसून उद्धव ठाकरे निवडणूक आयोगही बरखास्त करू शकतात…

दरदम्यान, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले मात्र, विरोधकांनी लढाई सुरु केली. त्यामुळे आम्हीही या लढाईत पूर्ण ताकदीने लढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि भाजपकडून हेमंत रासने रिंगणात उतरले आहेत.

दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी कसब्यात राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावत असल्याचं दिसून येतंय. काल रासने यांच्या प्रचारासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शहा देखील जोर लावत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी रस्सीखेच सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube