पुणे शिक्षक निवडणूक आमच्यासाठी खूपच सोपी कारण…, कौस्तूभ गावडे स्पष्टच म्हणाले

Kaustubh Gawade : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपकडून कौस्तूभ गावडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Kaustubh Gawade

Kaustubh Gawade : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपकडून कौस्तूभ गावडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांची मुख्य लढत महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर आणि अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्याशी होणार असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे उमेदवार कौस्तूभ गावडे यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून मी महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर लढत आहे. 2005 च्या आधी लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळत नाही. त्यांना जुनी पेन्शन मिळून देण्यासाठी तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करण्यासाठी मी लढणार असं लेट्सअप मराठीशी बोलताना कौस्तूभ गावडे (Kaustubh Gawade) यांनी सांगितले.

जुनी पेन्शन (Old Pension) आणि टीईटी (TET) सक्तीमुळे आज शिक्षकांमध्ये नाराजी आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून (Pune Teachers Constituency) मतदारांनी ज्या प्रतिनिधींना निवडून दिले होते त्यांनी या प्रश्नाबाबत शिक्षकांना न्याय दिलेला नाही. त्यामुळे आता या मतदारसंघात मतदारांना बदल हवा आहे. त्यामुळेच या निवडणुकीत मला महाराष्ट्र राज्य कृती समिती, महाराष्ट्र राज्य मुख्याधापक महामंडळ, टीडीएफ, दलित पॅंथर संघटना, जनता दल सेक्युलर यांसह विविध संघटना आणि पक्षांचे पाठबळ या निवडणुकीच्या निमित्ताने मला मिळत आहे.

जलजीवन योजनेचा उपयोग सर्वसामान्यांऐवजी ठेकेदारांना पोसण्यासाठी…खताळ यांचा थोरातांवर निशाणा-

आमच्यासाठी महाविकास आघाडी आता आव्हान नाही. मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांमध्ये कुठेही विद्यमान आमदारांचा संपर्क नसल्यामुळे खूप मोठी नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी खूप सोपी आहे असा विश्वास देखील भाजप उमेदवार कौस्तूभ गावडे यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना व्यक्त केला.

follow us