सराईत गुंडाचा माज, मुलाच्या मित्रांना बेदम चोपलं, राजकीय कनेक्शन समोर

सराईत गुंडाचा माज, मुलाच्या मित्रांना बेदम चोपलं, राजकीय कनेक्शन समोर

Kishor Bhegde : गहुंजेतील लोढा सोसायटीत सराईत गुन्हेगार असणाऱ्या किशोर भेगडे याने अल्पवयीन मुलांना मारहाण केली आहे. याप्रकरणी मारकुट्या किशोर भेगडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सोसायटीमध्ये किशोर भेगडे (Kishor Bhegde) याचा मुलगा आणि काही मित्र हे क्लब हाऊसमध्ये खेळत होते. किरकोळ कारणावरून खेळणाऱ्या या मुलांमध्ये वाद झाला. याची माहिती मिळताच किशोर भेगडे हा क्लब हाऊसमध्ये आला आणि त्याने या वादाचा जाब विचारात अल्पवयीन मुलांना जबर मारहाण केली.

यामध्ये एका पंधरा वर्षाच्या मुलाला किशोर भेगडे याने मारहाण केली त्याच्या पोटात बुक्की मारली याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. हा किशोर भेगडे मुलांना मारत असताना तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण हा भेगडे कोणाचंच ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर किशोर भेगडे याने मारहाण केलेल्या 15 वर्षीय मुलाच्या नातेवाईकांनी थेट शिरगाव पोलीस ठाणे गाठत या भेगडे विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे.

दहशतवादाचे मूळ पाकिस्तान अन् ही काँग्रेसची चूक, अमित शहांचा हल्लाबोल 

या तक्रारीनंतर भेगडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा किशोर भेगडे राजकीय घरातील आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या बापू भेगडे यांचा तो पुतण्या आहे. यापूर्वीही किशोर भेगडेवर एक खुणाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सराईत असणाऱ्या या गुंडाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे.

पार्टीत ड्रग्ज आढलेले नाही, रेव्ह पार्टीची व्याख्या काय? अब्रुनुकसानीचा दावा करणार; एकनाथ खडसे 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube