अजितदादांविषयी अपशब्दानंतर पक्षातून हकालपट्टी, हे सर्व प्री प्लॅन… म्हणत मासाळ आक्रमक

Kishor Masal यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Baramati Mafinama

Kishor Masal aggressive after expelled from NCP for abusive remarks about Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलं ते त्यांना चांगलंच भोवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आता नगरसेवक किशोर मासाळ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मासाळ यांची पक्षातून हाकलपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेतून भारतीयांसाठी गुड न्यूज! ट्रम्प यांची एच 1बी व्हिसावरील शुल्क वाढ फेडरल कोर्टाकडून बेकायदा

यानंतर किशोर मासाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी पक्षातून हकलपट्टी केली हे मला आता समजलं. पण हकलपट्टी का केली हे मी काल पत्रकार परिषद घेऊन विचारलं होतं. ही मला फाशी आहे हे अगोदरच ठरलं होतं असं किशोर मासाळ यांनी म्हटलं आहे.

Today Horoscopes : अनेक राशींना नशिबाची साथ कमीच; आजचा दिवस सावधगिरीने पार करा

व्हायरल होणारा रेकॉर्डिंग माझं नाही ते तुमच्याकडे आलं कसं? मला ब्लॅकमेल होत आहे. कोणी दिलं याची चौकशी करण्याची मागणी मी एका पत्राद्वारे बारामती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र याची कोणतीही चौकशी झाली नाही. उलट माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. तुझी ऑडिओ क्लिप आम्ही व्हायरल करू हे अगोदरच मला सांगितलं होतं हे सर्व प्री प्लॅन आहे. अपेक्षित आहे यात वेगळं काही नाही असं मासाळ यांनी म्हटलं आहे.

मासाळ यांनी नेमकं काय म्हटलं?

एखाद्या वेळी सैरभैर झाल्यावर आपण अडचणीत चाललोय म्हटल्यावर जिकडे दिशा दिसेल तिकडे आपण धावतो. मला ट्रॅप करून फसवलेलं आहे. ती क्लिप कुठून आली ती क्लिप माझीच आहे का आणि ती क्लिप कोणी वाजवायला दिली आणि का माझ्यावरती आरोप लावला याचा शोध होईपर्यंत तोपर्यंत ती क्लिप माझी नाही. एक सेकंदाच्या क्लिपवर तुम्ही कसं ठरवलं? की, तो मीच आहे म्हणून. कोर्ट सुद्धा दोन-चार सुनावण्या घेता आणि मग निर्णय घेत इथे सुनावणीच झाली नाही.

विधानपरिषदेत गनिमी कावा; पालकमंत्रिपद अडवून ठेवलं; शिवसेनचा आमदार तटकरेंवर पुन्हा बरसला

शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष यांचा मला निरोप आला होता. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की, मला सुनेत्रा पवार यांच्या समोर मला भूमिका मांडायची आहे. तुम्हाला कोणी काय ऐकवला आहे हे मला सांगा या सर्व गोष्टींसाठी मी त्यांची वेळ मागितली होती. पण या लोकांनी मला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही.तसेच माझ्या प्रकरणावर सुनावणी झाली नाही तरीही निकाल दिला आहे.याला योग्य का अयोग्य तुम्हीच ठरवा.

कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा जाग्यावर मृत्यू, घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

मी पत्रकार परिषद घेऊन विचारात आहे माझा गुन्हा काय आहे ? पण मला तुम्ही फाशी घ्यायला लावत आहात माझा गुन्हा तर सांगा. पत्रकार परिषद घेतल्यानंतर देखील माझा गुन्हा सांगितला नाही आणि डायरेक्ट हाकलपट्टी केली. जिथं अजित पवार यांचा अपघात झाला होता त्या ठिकाणी मी एक दिवस अन्नत्याग करून आत्मक्लेष करणार आहे हे मी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्याचं पत्रही मी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना आज दिलं आहे.

Congress Protest : काँग्रेस पक्षाच्या वतीने व शेतकरी विरोधी शासन निर्णयाची होळी करून निषेध आंदोलन

मात्र पोलिसांनी मला हे आत्मक्लेष अन्नत्याग आंदोलन करण्यास नकार दिला आहे तुमच्या जीवितास धोका आहे. मी जे 22 तारखेला पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देत म्हटलो आहे माझ्या जीवाला धोका आहे ते पोलिसांना आत्ताशीक समजलं. त्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्हाला किती जाता येणार नाही माझ्यावर अन्याय सुरू आहे. केस चालली नाही डायरेक्ट हुकूमशाही आली.

पुणेकरांनो सावधान! लवकरच पाणी कपात होणार?, महापौर मंजुषा नागपुरे काय म्हणाल्या?

माझा राजकारण संपवण्यासाठी हा प्लॅन आहे. माझं राजकारण संपवण्यासाठी एक टोळी सक्रिय आहे. मी बिनविरोध नगरसेवक झालो त्यादिवशीपासून आजपर्यंत माझ्यावर भयानक प्रसंग आले. माझी बदनामी करत सुटले आहेत. माझा फोन ट्रॅक कोणी केला त्यातील रेकॉर्डिंग बाहेर कसं केलं. याचा तपास करणार की मलाच गुंतवणार मी राजीनामा दिला की तुमचा विषय संपला का ? 2016 च्या नगरपालिकेला मी 16 मतांनी पराभूत झाल्यानंतर अजित पवार यांनी 2018 ला मला पक्षात घेतलं. जबाबदारीने पक्षाचे उपाध्यक्ष केलं राज्यभर मी वेगवेगळी आंदोलने केली त्याचं फलित म्हणून काय मिळालं.

Iran-Israel Conflict : हल्ला करणार नाही पण लेबनॉनला टार्गेट केलं तर प्रत्युत्तर ; इराणने दिला इशारा

माझे जे सहकारी होते ते मला अडून गोळ्या मारत होते. आज फक्त उघडपणे गेले. त्यांना दबाव टाकून बोलावण्यात आलं. आजपर्यंत आमच्या नगरसेवकांची एक मीटिंग देखील नाही सर्वच अस्वस्थ आहेत. बदनाम गल्लीचा मला फक्त आता प्रमुख केला आहे एक एक करून आख शहर त्या बदनाम गल्लीत येईल आणि एक दिवस मी त्या बदनाम गल्लीचा नगराध्यक्ष होईल.ही हकलपट्टी अपेक्षित होती. निकाल फिक्स असेल तर तिथे वकील देऊन काम होत नसतं. किशोर मासाळ यांचा प्रवेश घ्यायला आत्ताच जे अर्ध कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे ते धाराशिवला होते आज त्याच तटकरे साहेबांनी माझी हाकलपट्टी केली. माझं राजकारण संपवण्यासाठी चाललेला गेम आहे, माझा राजकारण संपणार नाही मी राजकीय भूमिका घेणार आणि ठासून घेणार. माझ्या ६५०० लोकांच्या सहाय्याने आणि माझा राजीनामा घ्या. मला येरवडायला पाठवण्याचा प्रयत्न होता.

follow us