जितेंद्र शिंदे होता मानसिक आजारी ; आत्महत्या कशी केली आले समोर
पुणे: नगर जिल्ह्यातील कोपर्डीतील (Kopardi) मुलीवर अत्याचार करून तिच्या हत्या केल्याचा गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या मुख्य आरोपीने कारागृहातच आपले जीवन संपविले आहे. मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (Jitendra Shinde) (वय 32) याने येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहेत. तसेच येरवडा कारागृह प्रशासनाने एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. जितेंद्र शिंदे हा मानसिक आजारी होता. त्याच्यावर मनोरुग्ण तज्ज्ञाकडून औषधोपचार सुरू होते, असे समोर आले आहे.
मोठी बातमी! कोपर्डी प्रकरणातील मुख्य दोषीची येरवडा कारागृहात आत्महत्या
2013 मध्ये कोपर्डीत पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, त्याला साथ देणारे संतोष भवाळ, नितीन भैलुमे या तिघांना जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या तिघांनी या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्यावर अध्याप सुनावणी सुरू झालेली नाही. शिक्षा सुनावलेले तिघेही येरवडा कारागृहात आहेत. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने रविवारी सकाळी गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे.
जन्माष्टमीची फटाकेबाजी परदेशी तरुणाला वाटला गोळीबार, दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी
शिंदे याने कशापद्धतीने आत्महत्या केली आहे हे आता येरवडा कारागृह प्रशासनानकडून सांगण्यात आले आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात देहांत शिक्षा झालेल्या जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (वय ३२) हा रविवारी सकाळी खोलीमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. शिंदेने टॉवेल फाडून कापडीपट्टीच्या सह्याने स्वतः गळफास बनवून त्यानंतर खोलीच्या दरवाजावरील लोखंडीपट्टीला बांधून सहा वाजण्याच्या सुमारास लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
सुरक्षारक्षक निलेश प्रकाश कांबळे यांनी रविवारी सकाळी ही घटना पाहिली. कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांनी शिंदे याला मयत घोषित केले आहे. शिंदेच्या मानसिक आजारावर कारागृहात मनोरुग्ण तज्ज्ञाकडून औषधोपचार सुरू होते, असे येरवडा कारागृह प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मानसिक विकृत
जितेंद्र शिंदे हा मानसिक विकृत होता. हे या खटल्यात सरकारची बाजू मांडत असलेल्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही न्यायालयात पुरावावरून सिद्ध केले होते. त्याच्या घरातून अश्लिल सीडीजही जप्त करण्यात आल्या होत्या.