जन्माष्टमीची फटाकेबाजी परदेशी तरुणाला वाटला गोळीबार, दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

जन्माष्टमीची फटाकेबाजी परदेशी तरुणाला वाटला गोळीबार, दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Jaipur Janmashtami : जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्माष्टमीला केलेल्या फटाकेबाजीला गोळीबार समजून एका परदेशी पर्यटकाने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामुळे त्याचे हात-पाय मोडले आहेत. तसेच गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जवाहर सर्कल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

नॉर्वेचा 33 वर्षीय तरुण जगतपुरा येथील एका हॉटेलमध्ये थांबला होता. जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजल्यानंतर लोकांनी फटाके फोडले आणि मोठ्या जल्लोषात नाचू लागले. फटाक्यांच्या आवाजाने त्याला जाग येताच परदेशी तरुणांनी गोळीबार समजला. लोकांनी केलेल्या जल्लोषाला स्वसंरक्षणाचा एक प्रकार मानून त्याने हॉटेलवरुन उडी मारली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी पर्यटकाला रुग्णालयात दाखल केले.

भाविकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त
याप्रकरणी जयपूरचे माजी डीसीपी ज्ञानचंद यादव यांनी सांगितले की, जगतपुरा येथील हरे कृष्ण मंदिर अक्षयपात्रात जन्माष्टमी उत्सव साजरा केला जात होता. मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर एका तरुणाने हॉटेलमधून उडी मारल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. जवाहर सर्कल पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना रुग्णालयात दाखल केले, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

G20 Summit 2023 : जागतिक GDP मध्ये G20 देशाचा वाटा किती?

पर्यटक ‘फायर’ आणि ‘मदत’ ओरडत होता
त्याचवेळी पर्यटक ‘फायर’ आणि ‘मदत’ करा असे ओरडत असल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मध्यरात्री फटाके जाळल्याचे दिसून आले. यामुळे परदेशी तरुण घाबरला होता.

G20 Summit : G20 राष्ट्रपतींच्या मेजवाणीत काश्मिरी हलवा, स्वीटमध्ये ‘स्वर्णकलश मिठाई’

योग सत्रात सहभागी होण्यासाठी भारतात आला होता
आधी तो हॉटेलच्या बाल्कनीत काही वेळ फिरला. त्यानंतर त्याने खिडकीतून उडी मारली. नॉर्वेच्या नमसोस येथील एक व्यक्ती योग सत्रात सहभागी होण्यासाठी भारतात आल्याचे समोर आले आहे. नुकतेच त्यांनी जयपूरला जाण्यासाठी हॉटेल बुक केले होते. पोलिसांनी या घटनेची संपूर्ण माहिती नॉर्वे दूतावासाला दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube