G20 Summit : G20 राष्ट्रपतींच्या मेजवाणीत काश्मिरी हलवा, स्वीटमध्ये ‘स्वर्णकलश मिठाई’
G20 Summit Dinner Menu : सध्या राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या परिषदेसाठी जगभरातील अनेक नेते हजर झालेा आहेतत. या परिषदेत अनेक महत्वाचे करार होणार आहेत. आज पहिल्याच दिवशी भारताला मोठे यश मिळाले. या परिषदेत नवी दिल्ली जी 2- लिडर्स परिषद जाहीरनामा सर्वानुमते स्वीकारण्यात आला. दरम्यान, आता थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आयोजित केलेल्या डिनरला पाहूणे नेते उपस्थित राहणार आहेत.
भारत मंडपमच्या लेव्हल 3 मध्ये या डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यप्रमुखाच्या डिनरमध्ये खास, स्वादिष्ट आणि अप्रतिम पदार्थ असणार आहेत. या मेजवानीचे मेनू कार्ड आता सोशल मीडियावर समोर आले आहे.
डिनर मेनू वसुधैव कुटुंबकम एक पृथ्वी. एक कुटुंब, एक भविष्य या भावनेला समर्पित. यामध्ये काश्मिरी कहवा, दार्जिलिंग चहा, मुंबई पाव, अंजीर-पीच मुरब्बा यासह देशातील अनेक प्रसिद्ध पदार्थांचा समावेश आहे
G-20 in India | Menu of the dinner hosted by President Droupadi Murmu at Bharat Mandapam in Delhi#G20India2023 pic.twitter.com/ynToOCXRiR
— ANI (@ANI) September 9, 2023
मेनूमध्ये काय आहे?
स्टार्टर डिशेस
पात्रम ‘ताजी हवा का झोंका’
दही गोळा आणि भारतीय मसालेदार चटनींनी सजलेलं कंगणी श्रीअन्न (मिलेट), लीफ क्रिस्प (दूध, गहू आणि खवा युक्त)
मेन कोर्स
वनवर्णम ‘मातीचे गुणविशेष’
ग्लेजड कॉरेस्ट मशरूम, कुटकी श्रीअन्न (मिलेट) क्रिस्प आणि करी पत्त्यांसोबत तैयार केरळ काट तांदुळाने परतलेले कटहल गॅलेट (दूध व गहू युक्त)
भारतीय रोटी
– मुंबई पाव
नायजेला चवीचे मऊ बन्स (दूध आणि गहू सह)
Morocco Earthquake: विध्वंसक भूकंपात एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू ; जास्त मृत्यू कशामुळे ?
– बाकरखानी
वेलची चवीची गोड रोटी (दूध, साखर आणि गहू सह)
पेय पदार्थ
कश्मीरी कहवा, फिल्टर कॉफी और दार्जलिंग चाय
गोड पदार्थ
मधुरिमा ‘स्वरर्ण कलश’
वेलचीचा सुगंधित असलेला सांवाचा हलवा , अंजीर-आडू मुरब्बा आणि आंबेमोहर राइस क्रिस्प्स (दूध,श्रीअन्न, गहू आणि सुका मेवा युक्त )
पेय
काश्मिरी कहवा, फिल्टर कॉफी आणि दार्जिलिंग चहा
दरम्यान, राष्ट्रपती भवनात 180 लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा फूड मेन्यू पंचतारांकित हॉटेलच्या 2500 कर्मचाऱ्यांनी तयार केला आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, त्यांची पत्नी सुदेश धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील डिनरला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा हे देखील या डिनरला उपस्थित राहणार आहेत.