Lalit Patil Case : मोठी अपडेट! ललित पाटील प्रकरणी वैद्यकिय अधिकारी गजाआड
Lalit Patil Case : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात (Lalit Patil Case) आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला गजाआड केल्यानंतर आणखी एका वैद्यकिय अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ससून रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण देवकाते यांना पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटीलला मदत केली म्हणून या अधिकाऱ्याला आधी निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर काल या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ललित पाटील याला रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याचाही आरोप या अधिकाऱ्यावर आहे. रुग्णालयातील आणखी एक अधिकारी अटक झाल्याने याची मोठी चर्चा सुरू आहे.
Lalit Patil Case : मोठी अपडेट! ललित पाटील प्रकरणात ‘ससून’मधील कर्मचाऱ्याला बेड्या
ललित पाटील हा डॉ. देवकाते यांच्या निगराणीखाली रुग्णालयात उपचार घेत होता. काल रात्री उशिरा पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. देवकाते रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत होते. डॉ. देवकाते यांनी ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढवला होता, अशीही माहिती आता समोर येत आहे. डॉ. देवकाते हा ललित पाटीलचा भाऊ आणि आणखी एका साथीदाराच्या संपर्कात होता.
ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना पळून गेला होता. त्यानंतर मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी परराज्यातून अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. न्यायालयाच्या परवानगीने ललित पाटील याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यात आणले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या नाशिक येथील घराची झडती घेतली असता कोट्यावधी रुपयांचे सोने आढळले होते.
1 ऑक्टोबरला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता त्यावेळी हे दोघेही कैद्यांसाठी 16 नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या या दोन पोलीस कॉन्स्टेबसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ललित पाटीलवर पुण्यातील ससून रूग्णालयात (Sassoon Hospital) उपचार सुरू होते. मात्र, कैदी असतानादेखील ललितला ससून रूग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात होती. या सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी पाटील लाखो रूपये खर्च करत असे.
Lalit Patil प्रकरणी निलंबित डॉक्टरांचा धक्कादायक दावा; म्हणाले डीनच्या आदेशानेच..