Live : कसबा, चिंचवड ‘मत’संग्राम; आतापर्यंत ३० टक्के मतदान

  • Written By: Published:
Live : कसबा, चिंचवड ‘मत’संग्राम; आतापर्यंत ३० टक्के मतदान

पुण्यातील कसबा, चिंचवड या दोन विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. दोन्ही जागा या भाजप, महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे मतदान करून घेण्यासाठी चुरस दिसून येत आहे.

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Feb 2023 03:43 PM (IST)

    कसब्यात मतदानांचा टक्का वाढला

    दुपारी तीन वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात ३०.५ टक्के मतदान झाले आहे. तर चिंचवड मतदारसंघात ३०.५५ टक्के मतदान झाले आहे. दुपारी एकपर्यंत कसबा मतदारसंघात १८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दोन तासांत मतदानाचा टक्का वाढला आहे.

  • 26 Feb 2023 03:13 PM (IST)

    कसबा मतदारसंघात पैसे वाटपावरून वाद, बीडकरांचा काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला

    चिंचवडनंतर कसबा मतदारसंघातही गोंधळ, भाजपच्या गणेश बीडकरांचा काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला. बीडकर भाजप कार्यकर्त्यांसह पैसे वाटप करत असल्याचा काँग्रेसचा. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे देखील पोलीस ठाण्यात दाखल.

  • 26 Feb 2023 01:53 PM (IST)

    चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी दुपारपर्यंत संथगतीने मतदान

    दुपारी १ वाजेपर्यंत चिंचवडसाठी २०.६८ टक्के, तर कसबा पेठसाठी १८. ५ टक्के मतदान

  • 26 Feb 2023 11:51 AM (IST)

    चिंचवड विधानसभेसाठी आतापर्यंत ११ टक्के मतदान

    चिंचवड विधानसभेसाठी ११ वाजेपर्यंत १०. ४५ मतदान, ३६ हजार ८६६ पुरुषांचे मतदान, तर २२ हजार ५७० स्त्रियांचे मतदान

  • 26 Feb 2023 11:41 AM (IST)

    live कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतदान

    चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या वेळी भाजप उमेदवार अश्विनी जगताप व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे समर्थक आपसात भिडले आहेत. (By Election) चिंचवडमध्ये जगताप समर्थक गणेश जगताप (Ganesh Jagtap) आणि कलाटे समर्थक माजी नगरसेवक सागर आंघोळकर (Sagar Angholkar)यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी भांडणात एकमेकांना मारण्यासाठी दगड उचलल्याचे पाहायला मिळाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube