पर्यटनाला आले अन् देवदूत ठरले! भुशी डॅम घटनेतील ह्रदय बंद पडलेल्या चिमुकलीला डॉक्टरांकडून जीवनदान

पर्यटनाला आले अन् देवदूत ठरले! भुशी डॅम घटनेतील ह्रदय बंद पडलेल्या चिमुकलीला डॉक्टरांकडून जीवनदान

Lonavala Bhushi Dam Incidence Doctors Give CPR to Girl : लोणावळ्यातील भुशी डॅम (Bhushi Dam) परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये वाहून गेलेल्यांपैकी 5 जणांना बाहेर पडण्यात यश आले. त्यातील एका मुलीचे ह्रदय बंद पडले होते. मात्र यावेळी पर्यटनासाठी आलेल्या दोन डॉक्टरांनी (Doctors) तिचे प्राण वाचवले. या डॉक्टरांनी तिला सीपीआर (CPR) दिला माऊथ टू माऊथ ब्रिथिंग दिलं. त्यामुळे हे पर्यटक म्हणून आलेले डॉक्टर या मुलीसाठी देवदूत ठरले आहेत. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याने त्या मुलीचे हृदय बंद पडलं होतं.

काय आहे नेमकं प्रकरण?

लोणावळ्यातील भुशी डॅम (Bhushi Dam) परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी घडली होती. हे लोक पर्यटनाला गेले असताना त्यांनी धबधब्यात प्रवेश केल्याने ते वाहून गेले होते. त्यात एकूण दहा जण वाहून गेले होते. मात्र 5 जणांना बाहेर पडण्यात यश आले आणि पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चौघांचे मृतदेह सापडले आहेत. तर एका शोध अद्यापही सुरूच आहे.

परळीच्या खून प्रकरणात रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, धनंजय मुंडेंचे राईट आणि लेफ्ट हॅंन्ड…

या बुडालेल्या लोकांमध्ये 4 ते 13 वर्ष वयोगटातील तीन मुली, एक मुलगा तसेच एका महिलेचा समावेश आहे. यापैकी महिला आणि एका तेरा वर्षीय मुलीचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे. मात्र अद्यापही अन्य तिघांचा शोध सुरूच आहे. या घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार हे बुडालेले लोक पुण्यातील हडपसर येथील सय्यद नगरमधील अन्सारी कुटुंबातील आहेत. शाहिस्ता लियाकत अन्सारी (वय वर्ष 36), अमीमा आदिल अन्सारी (वय 13), अदनान सभाहत अन्सारी (वय 04), मारिया अकिल सय्यद (वय 09), उमेरा आदिल अन्सारी (वय 08) असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

बेताल वक्तव्यामुळे तरुणांमध्ये गैरसमज; थोरातांना उत्तर देत फडणवीसांनी फटकारले

हे सर्वजण रविवारी ते भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते या प्रवाहात उतरले. मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील सातही जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश आलं. मात्र दुर्दैवाने पाच जण वाहून गेले.

या घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर यावेळी पोलिसांना शिवदुर्ग मित्र बचाव पथकाने शोध कार्य करण्यास मदत केली. पाऊस सुरू असल्याने या बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत. या घटनेनंतर परिसरातील लोकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube