Pune Congress : पाठिंब्यासाठी सह्या घेतल्या, अर्ज माघारीचं सांगितलंच नाही…अरविंद शिंदेंकडून पोलखोल

पुण्याच्या काँग्रेसचे खच्चीकरण केलं जात आहे आणि यासाठी निरीक्षक नेमावा अशी मागणी पुणे कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांनी पत्रात केली आहे.

Arvind shinde

Pune Congress : पुणे विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे उमेदवार विक्रम काकडे बिनविरोध विजयी झाले आहेत. याच घडामोडींनंतर पुणे काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे (Arvind Shinde ) यांनी थेट कॉंग्रेस हायकमांडला पत्र लिहून पुणे जिल्ह्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी केलीयं. यासोबतच निवडणुकीदरम्यान, घडलेल्या घडामोडींवरुनही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

विधानपरिषदेच्या अमरावती आणि चंद्रपूरमधून मागे घेतलेल्या उमेदवारांवर कारवाई केली मग पुणे विधानपरिषद बद्दल का नाही केली गेली? मी आजची नाराजगी व्यक्त करतोयं, ती स्वतःच्या काँग्रेस पक्षाविरोधात करतोय, असं मत पुण्यातील काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदेंनी व्यक्त केलं आहे. तसेच पुणे काँग्रेसचं खच्चीकरण केलं जात असून विधानपरिषद निवडणुकीला थेट पाठिंबा द्या, असं शहराध्यक्षांनी सांगितलं, तेव्हा आमच्या सह्या घेतल्या पण जेव्हा अर्ज मागे घ्यायची वेळ आली तेव्हा आम्हाला कोणालाच काही सांगितलं गेलं नाही, असा गौप्यस्फोट अरविंद शिंदे यांनी केला आहे.

दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला, सातारकरांनो ताकद दाखवून द्या…जगतापांसाठी जयंत पाटील मैदानात!

तसेच विधानसभा असो किंवा महापालिका यामध्ये झालेल्या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. कुठल्याच निवडणुकीत जर काँग्रेस लढणार नसेल आणि अशी प्रतिमा करणार असेल तर पुणे महापालिकेत १५ नगरसेवक जे जिंकले आहेत त्यांचं काय? त्यांच्या भावनेचे आणि प्रामाणिकपणाचे काय असा प्रश्न सुद्धा यावेळी शिंदे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत शरद पवार गटाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून काँग्रेसमध्ये हा अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात स्थानिक पातळीवर कोणत्याही नेत्याशी किंवा कार्यकर्त्याशी चर्चा न करता, परस्पर शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असल्याच आरोप अरविंद शिंदे यांनी केला आहे.

अरविंद शिंदे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना थेट ईमेल पाठवून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

follow us