पांडुरंगा तुच माझा… दुजा कुणी नाही; कडक भक्ती युट्यूबवर नवीन भक्तिगीत
Kadak Bhakti: या भक्तिगीताला सुप्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे यांनी आपल्या मधुर आवाजाची साथ दिली आहे. संगीतकार डॉ. नीरज करंदीकर यांनी या गीताला भावस्पर्शी संगीत दिले आहे.
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विठ्ठलभक्तांसाठी कडक भक्ती या यूट्यूब चॅनेलने (Kadak Bhakti) एक खास भक्तिगीत तयार केलंय. ”पांडुरंगा तुच माझा… दुजा कुणी नाही” या भक्तिगीतातून विठुरायाप्रती असलेली अखंड भक्ती आणि समर्पण सुरेल स्वरांतून व्यक्त करण्यात आले आहे.
या भक्तिगीताला आपल्या सुरेल आणि मधुर आवाजात सुप्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे यांनी स्वरबद्ध केले आहे. संगीतकार डॉ. नीरज करंदीकर यांनी या गीताला भावस्पर्शी संगीत दिले आहे. डॉ. संगीता बर्वे यांची शब्दरचना आहे. या भक्तिगीताची प्रस्तुती सोहम म्युझिकची (Sohamm Music) आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या चरणी भक्तीची गीत विठ्ठलभक्ताने अनुभवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हे भक्तिगीत कडक भक्ती (Kadak Bhakti) या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. भाविकांनी ते पाहून, ऐकून अधिकाधिक विठ्ठलभक्तांपर्यंत पोहोचवावे.
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥
🙏 आषाढी एकादशी विशेष 🙏
“पांडुरंगा तुच माझा… दुजा कुणी नाही”
विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेले हे सुंदर भक्तिगीत आता आपल्या भेटीला!
🎤 सुप्रसिद्ध गायिका: प्रियंका बर्वे
🎼 संगीत: डॉ. नीरज करंदीकर
✍️ शब्दरचना: डॉ. संगीता बर्वे
🎵 प्रस्तुती: Sohamm Music