हल्लेखोरांना तत्काळ गजाआड करा; काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला मारहाणीचा खुलासा

हल्लेखोरांना तत्काळ गजाआड करा; काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला मारहाणीचा खुलासा

kasaba Bypoll : कसबा मतदारसंघातील (kasaba Bypoll) मालधक्का चौकात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यात जोरदार राडा झाला. भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून येथे पैसे वाटप होत असल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे. यानंतर आता तेथील प्रत्यक्षदर्शी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे नेमके काय घडले, याचा खुलासा केला आहे.

येथे पैसे वाटप होत असल्याचे कळाल्यावर आम्ही तेथो गेलो. तर तेथे काही लोक पैसे वाटत असल्याचे दिसले. त्यानंतर आम्ही त्यांना थांबवले आणि पोलिसांना फोन केला. पोलीस तेथे आले. पोलीस आल्यानंतरही तेथे गणेश बीडकर यांनी त्यांच्या साथीदारांसह थेट आमच्यावर हल्ला केला. त्यांनी आम्हाला मारहाण केली. तेथे भाजपचे लोक सर्रास पैसे वाटत होते. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक करावी. अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार असल्याचे काँग्रेसचे (Indian National Congress) फैय्याज शेख यांनी सांगितले.

वाचा : कसब्यात राडा, भाजपच्या बीडकरांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण

याकूब शेख म्हणाले, की मी घटनास्थळी होतो. त्यावेळी नईम शेख नावाचा व्यक्ती तेथे होता. काही लोक तेथे होते. काही लोकांनी पोलिसांसमोर आमच्यावर हल्ला केला. त्याठिकाणी सीसीटीव्ही आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावेत. आम्ही पैशांची पकडलेली बॅग त्यांनी पळविली. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचे याकूब शेख यांनी सांगितले.

Kasba Chinchwad Bypoll : संजय राऊतांनी व्यक्त केली वेगळीच भीती; म्हणाले, हा तर त्यांचा प्रशासनावर..

दुपारी तीन वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात ३०.५ टक्के मतदान झाले आहे. तर चिंचवड मतदारसंघात ३०.५५ टक्के मतदान झाले आहे. दुपारी एकपर्यंत कसबा मतदारसंघात १८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दोन तासांत मतदानाचा टक्का वाढला आहे.

याआधी चिंचवड येथेही असाच प्रकार घडला होता. चिंचवड येथील मतदान केंद्रावर जोरदार राडा झाला. पिंपरी गुरव येथील मतदान केंद्रावर माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांत प्रथम बाचाबाची आणि नंतर जोरदार हाणामारी झाल्याची माहिती मिळाली. हा वाद नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. त्यामुळे येथील परिस्थिती नियंत्रणात आली. मतदान सुरळीत सुरू आहे. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदानाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube