पुण्येश्वर मंदिराच्या बाजूचे अतिक्रमण हटवा, अन्यथा…; मिलिंद एकबोटेंचं वादग्रस्त विधान
Milind Ekbote : पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या (Puneshwar temple) अतिक्रमणाविरोधात भाजपसह अन्य हिंदू संघटनांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठं आंदोलन केलं होतं. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी कारवाई केली नाहीतर मज्जीद पाडून टाकू, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर आता समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी एक वादग्रस्त विधान केलं. पुण्येश्वर मंदिराच्या बाजूचे अतिक्रमण हटवले नाही, तर पुण्यातील बाबरी मज्जीद पाडू, असे वक्तव्य एकबोटे यांनी केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर परिसरात प्रार्थनास्थळावरून वाद सुरू आहे. या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासह तिघांवर पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मिलिंद एकबोटे आज सायंकाळी सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी शेळगी परिसरातील भोईराज गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची महाआरती करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्येश्वर मंदिरासंदर्भात भाष्य केलं.
धक्कादायक! देशात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण; WHO कडून आकडेवारी जाहीर
ते म्हणाले की, पुण्यातील कसबा पेठेतील पुणेश्वर मंदिराच्या बाजूला अतिक्रमण करून दर्गा बांधली जात आहे. मज्जीदही बांधली जात आहे. याला संपूर्ण हिंदू समाज विरोध करत आहे. हिंदू बांधवांसाठी लढणार, सरकारने हे अतिक्रमण हटवले नाही, तर पुण्यात बाबरी साऱखे कांड करू, असं वादग्रस्त विधान एकबोटेंनी केले आहे.
यावेळी चोराच्या उलट्या बोंबा, अशी टीका करत अतिक्रमण हटवले नाही, तर पुण्यातील बाबरी मशीद पाडू, त्यासाठी कोणत्याही परिस्थितीला किंवा गुन्ह्याला घाबरणार नाही, असेही एकबोटे यांनी स्पष्ट सांगितलं.
4 सप्टेंबर रोजी एकबोटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पुण्येश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी पुणे पालिकेसमोर आंदोलन केले. मात्र, तेव्हा या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही त्यांनी आंदोलन करून करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाची तक्रार पुणे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. आणि आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.