पुण्यात बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, नेमकं काय आहे प्रकरण?

  • Written By: Published:
पुण्यात बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली म्हणून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने काल पुण्यात बॅनरबाजी करून बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. कारण नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या खटल्यात दोन वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्यासाठी जे बॅनर लावले होते त्याला उत्तर देण्यासाठी बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन करत बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत त्यांची प्रतिमा स्वच्छ असल्याचे सांगतले. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी बच्चू हे अपंगाचे हृदय सम्राट असा उल्लेख केला आहे.

लोकशाहीचा मुडदा पडला तरी.., जितेंद्र आव्हाडांचा खास शैलीत घणाघात 

बच्चू कडू यांनी 2017 मध्ये नाशिक महापालिकेत अपंगासाठी आंदोलन केले होते. त्यामुळे बच्चू कडू यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना नाशिक न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. म्हणून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांचा उल्लेख अपंगाचे हृदयसम्राट असा उल्लेख केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube