हॉल तिकीट ‘लीक’वर एमपीएससीचा खुलासा ! सायबर पोलिसांकडे धाव

  • Written By: Published:
हॉल तिकीट ‘लीक’वर एमपीएससीचा खुलासा ! सायबर पोलिसांकडे धाव

MPSC 2023 : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट एका टेलिग्राम चॅनेलवर व्हायरल झाले आहे. सुमारे ९० हजार विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व्हायरल झाले आहे. त्यावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एका प्रसिध्दीपत्रक काढून खुलासा केलाय.

MPSC Exam 2023: हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व्हायरल; आयोगाचे काय स्पष्टीकरण ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या ३० एप्रिल रोजी अराजपत्रित पदासाठी गट ब आणि गट क प्रवर्गासाठी संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठीच प्रवेश प्रमाणपत्रे २१ एप्रिल रोजी आयोगाने वेबसाइटवर, तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. पण बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेश प्रमाणपत्रे (हॉल तिकीट) एका टेलिग्राम चॅनेवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. हे निदर्शनात आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.

भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

चॅनेलवर प्रसिध्द झालेली प्रमाणपत्र वगळता उमेदवारांची कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही, याची तज्ञ्ज्ञांकडून खात्री करण्यात आलेली आहेत. तसेच टेलीग्रामवर प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे डाउनलोड करून घेतलेल्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

याप्रकारचा परीक्षेवर कोणत्याही परिणाम होणार नाही. तर पूर्व नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार असल्याचे आयोगाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube