दहा वर्षानंतर नरेंद्र दाभोळकरांना न्याय मिळणार! उद्या निकाल लागण्याची शक्यता

दहा वर्षानंतर नरेंद्र दाभोळकरांना न्याय मिळणार! उद्या निकाल लागण्याची शक्यता

Narendra Dabholkar Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर (Dabholkar murder) यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉक करत असताना पुण्यात शनिवार पेठेतील ओंकारेश्वर पुलाजवळ गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आजपर्यंत या प्रकरणाचा निकाल काही लागला नाही. मात्र, आता तब्बल 10 वर्षानंतर म्हणजे उद्या दाभोळकरांच्या (Narendra Dabholkar) हत्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. (Dabholkar Case ) न्यायाधीश पी. पी. जाधव हे या प्रकरणाचा निकाल देण्याची शक्यता आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे.

 

Narendra Dabholkar: हत्या प्रकरणाचा सीबीआयचा तपास पूर्ण

खटल्याची वर्षभर सुनावणी

या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर 15 सप्टेंबर 2021 ला आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत. न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची वर्षभर सुनावणी झाली. दरम्यान, या प्रकरणातील विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

 

मॉर्निंग वॉक करत असताना हत्या

नरेंद्र दाभोळकर यांनी विवेकी विचारांनी सामाजिक कुप्रथा, धार्मिक अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्था यांच्या निर्मूलनासाठी आपले जीवन समर्पित केले होते. दाभोळकर यांनी कायम विवेकी विचारांनी समाजातील अंधश्रद्धा फोफावणाऱ्या घटनांवर भाष्य केलं. त्यामधून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. हे कार्य सुरू असतानाच त्यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉक करत असताना पुण्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडे होता. पुढे तो केंद्रीय अन्वेशन (सीबीआय) विभागाकडे सोपवण्या आला.

 

खटला अंतिम टप्प्यावर

या हत्या खटल्यात फिर्यादी पक्षाने 20 साक्षीदार तपासले तर बचाव पक्षाने दोन साक्षीदार तपासले. या प्रकरणाव विशेष सरकारी वकील म्हणाले, आम्ही 20 साक्षीदार तपासले असून खटला पूर्ण झाला आहे. त्यामुळे हा खटला अंतिम आदेशाच्या टप्प्यावर आहे असंही ते म्हणाले आहेत. तर, बचाव पक्षाचे वकिल प्रकाश सिलसिंगीकर म्हणाले, आमच्या दोन साक्षीदारांची बचाव पक्षाने तपासणी केली. मात्र, आम्ही या लोकांची दाभोळकर यांच्या हत्तेतील भूमिका नाकारली आहे.

 

गोविंद पानसरे हत्येप्रकरणी 10 जणांवर दोष निश्चिती

या विचारवंतांची हत्या

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर फेब्रुवारी 2015 मध्ये ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉमरेड गोविंद पानसरे यांनी कोल्हापूर येथे हत्या करण्यात आली. पुढे कन्नड साहित्यिक एम.एम कलबुर्गी यांची हत्या केली. त्याचबरोबर सप्टेंबर 2017 मध्ये पत्रकार विचारवंत गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. या विवेकवादी विचारवंतांना मारण्यासाठी जी हत्यार वापरली ती एकच असल्याचा संशय होता. परंतु, अद्याप या हत्यारांबद्दल तपास करण्यात आला नाही.

 

कोण होते नरेंद्र दाभोलकर?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 रोजी सातारा जिल्ह्यात झाला. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉक्टर होण्याऐवजी त्यांनी समाजकार्यात स्वत:ला गुंतवून घेतलं. 1982 पासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांचा पूर्ण सहभाग होता. 1989 मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. ही संस्था कोणत्याही प्रकारची सरकारी किंवा परकीय मदत न घेता काम करते. मात्र, अनेक कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटना त्यांना हिंदूविरोधी मानत होत्या. त्यांच्या हत्येनंतर गोविंद पानसरे, कर्नाटकात प्राध्यापक एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube