शरद पवारांनी तोपर्यंत अध्यक्ष राहावं; अंकुश काकडेंची विनंती

शरद पवारांनी तोपर्यंत अध्यक्ष राहावं; अंकुश काकडेंची विनंती

Ankush Kakade On Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय (Political)वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या या निर्णयानं धक्का बसला आहे. पवारांचा हा निर्णय बदलण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करत आहे. पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अनेक नेत्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच पुण्यातील (Pune)राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे (Ankush Kakade)म्हणाले की, शरद पवार साहेबांचा निर्णय हा मलाच नाही तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 100 टक्के लोकांना मोठा धक्का बसला आहे.

Prithviraj Chavan : काँग्रेससोबतच्या ‘त्या’ वादावादीने शरद पवारांचा पहाटेच्या शपथविधीला सहमती

यावेळी अंकुश काकडे म्हणाले की, शरद पवार यांनी निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पवार साहेबांनीच अध्यक्ष म्हणून राहावं अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पवार साहेबांनी देखील ही कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली आहे. सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी दोन तीन दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यानंतर ते आपला निर्णय सांगणार आहेत.

जर पवार साहेब नसतील तर वेगळा विचार कोणाचा करायचा? यासाठी त्यांनी दहा ते बारा जणांची समिती नेमली आहे. त्या समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते निर्णय घेणार आहेत. राज्यात घडणाऱ्या सगळ्या घटणांचा विचार करतील, विरोधी पक्षामध्ये काय मतं आहेत त्याचाही ते विचार करतील. त्यांना जे योग्य वाटेल तो अहवाल पवार साहेबांना देतील त्यानंतर शरद पवार त्याचा निर्णय घेतील.

मी एक कार्यकर्ता म्हणून 2024 च्या लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत पवार साहेबांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सांभाळावं, पाहिजे तर त्यांच्या मदतीला कार्याध्यक्ष म्हणून कोणीतरी द्यावं, कोण कार्याध्यक्ष द्यावं हे समितीनं ठरवावं किंवा पवार साहेबांनी जरी ठरवलं तरी कोणाही कार्यकर्त्यांना आक्षेप असण्याचं कारण नाही, असंही अंकुश काकडे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून अजितदादांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, त्याच्यामुळेच शरद पवार यांनी असा निर्णय घेतला की काय? असं विचारल्यावर अंकुश काकडे म्हणाले की, अजितदादांनी अनेकदा जाहीर केलं की, मी राष्ट्रवादी कदापी सोडणार नाही, मी राष्ट्रवादीमध्येच राहणार आहे, माध्यमांच्या बाबतीत किंवा कदाचित भाजप हेतुपुरस्सपणे या बातम्या पेरतं. त्याचा तो परिणाम होतो. अजितदादांनी अनेकवेळा याचा खुलासा केला आहे. त्या बातम्यांचा किंवा अजितदादांचा आणि पवार साहेबांच्या निर्णयाचा काहीही संबंध नाही, असेही यावेळी अंकुश काकडे यांनी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube