बांधकाम क्षेत्रातील विश्वासार्ह नावाची नवी ओळख; ‘ए वन ग्रुप’ ची ‘युगम रिअल्टी’ म्हणून नव्या वाटचालीस प्रारंभ
A One Group या पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील ग्रुप’ने स्वतःची ओळख बदलत आता ‘युगम रिअल्टी’ या नवीन ब्रँड नावाने काम करण्याची घोषणा केली आहे.
New identity of a trusted name in the construction sector; ‘A One Group’ begins a new journey as ‘Yugam Realty’ : बांधकाम क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारणाऱ्या ‘ए वन ग्रुप’ने स्वतःची ओळख बदलत आता ‘युगम रिअल्टी’ या नवीन ब्रँड नावाने काम करण्याची घोषणा केली आहे. या बदलासह ‘Foundation to Future’ ही नवी टॅगलाईन जाहीर करण्यात आली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय कणेकर यांनी ही माहिती दिली.
‘युग’ पासून ‘युगम’: गुणवत्तेची नवी प्रेरणा
संजय कणेकर यांनी सांगितले की, ‘युग’ या संस्कृत शब्दापासून निर्माण होणाऱ्या ‘युगम’ या शब्दाचा अर्थ आहे – या काळात घडणारे सर्वोत्तम. पूर्वीची टॅगलाईन “Working Together Works” प्रमाणेच ग्राहकांसाठी उत्तम घडविण्याच्या एकत्रित भावनेने काम करणे या तत्त्वाचा विस्तार ही नवी ओळख दर्शविण्यात आली आहे.
12 लाख चौरस फूटांहून अधिक बांधकाम
नाव बदलले असले तरीही कंपनीचा बांधकाम आणि गुणवत्ता याबाबतची परंपरा कायम असल्याचे कणेकर म्हणाले. आत्तापर्यंत समूहाने पुणे आणि मुंबई महानगरात मिळून 12 लाख चौरस फुटांहून अधिक निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र विकसित केले असून कंपनीशी 5000 हून अधिक समाधानी ग्राहक जोडले गेले असून, सध्या 7 प्रकल्प सुरू असून 16 नवीन प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सोसायटी पुनर्विकासातही दमदार कामगिरी
युगम रिअल्टीने मागील आठ वर्षांपासून गृह सोसायटी पुनर्विकास क्षेत्रातही उल्लेखनीय प्रवेश केला असून, सातत्याने प्रकल्प उभारणीमुळे सोसायटी धारकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे, असे कणेकर म्हणाले.
देशभर विस्ताराचे नियोजन
युगम रिअल्टीने बेंगळुरूसह देशातील इतर महानगरात विस्ताराचे नियोजन सुरू केले आहे. यापूर्वी कंपनीने श्रीलंकेत कोलंबो येथे प्रकल्प पूर्ण केले असल्याने आंतरराष्ट्रीय अनुभवही कंपनीकडे असल्याचे कणेकर यांनी सांगितले.
ग्राहकांच्या विश्वासाचा वारसा पुढे “पुणे–मुंबईतील ग्राहक, सल्लागार, एजन्सी, विक्रेते आणि हितचिंतकांनी दिलेला विश्वास आमची सर्वात मोठी शक्ती आहे. तोच विश्वास युगम रिअल्टीसह अधिक दृढ होईल,” असा विश्वास संजय कणेकर यांनी व्यक्त केला.
