चिंचवड निवडणुकीत वाढला सस्पेन्स; अजित पवार म्हणाले..

चिंचवड निवडणुकीत वाढला सस्पेन्स; अजित पवार म्हणाले..

Chinchwad Election : कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महाविकास आघाडीतील बंड तुर्तास शांत झाले. त्यानंतर आता  चिंचवडमध्येही (Pimpari Chinchwad Election) निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. कसब्यात बाळासाहेब धाबेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघात आपल्याला यश मिळाले आहे. पिंपरी चिंचवडमध्येही तसे प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. यश आलं तर ठीक नाही तर सामोरे जायचे, अशा शब्दांत त्यांनी पिंपरी चिंचवडमधील निवडणुकीबाबत सूचक वक्तव्य केले.

पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण धंगेकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्येच बंडखोरी उफाळून आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीचसमोर दाभेकरांची बंडखोरी आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती.याचमुळे काँगेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दाभेकरांची मनधरणी सुरु होती. पण त्यानंतर थेट दिल्लीतून राहुल गांधी यांचा फोन आल्यामुळे त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये याची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, की पिंपरी चिंचवडमध्येही प्रयत्न सुरू आहेत.जर यश मिळाले नाही तर निवडणुकीला सामोरे जायचे, असे पवार यावेळी म्हणाले.

यंदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या रुपात तगडा उमेदवार दिल्याने भाजपच्या हेमंत रासने यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. रवींद्र धंगेकर यांनी एक नव्हे तर दोन विधानसभा निवडणुकांमध्ये गिरीश बापट यांना पाळता भुई थोडी केली होती. त्यामुळे हेमंत रासने यांना रवींद्र धंगेकर यांचे तगडे आव्हान असणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात १९९५ पासून भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर २०१९ साली गिरीश बापट खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक या कसब्याच्या आमदार झाल्या. या पोटनिवडणुकीच्या रूपाने काँग्रेसला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी चालून आहे.

 

खर्चाच्या मर्यादेत वाढ

कसबा व पिंपरी चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांसाठी निवडणूक खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. या उमेदवारांना आता ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. तो निर्णय या दोन्ही मतदारसंघांसाठी लागू करण्यात आला आहे. याआधी निवडणूक खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube