पिंपरी-चिंचवड भाजपला अधिवेशनानंतर मिळणार नवा शहराध्यक्ष?

पिंपरी-चिंचवड भाजपला अधिवेशनानंतर मिळणार नवा शहराध्यक्ष?

पुणे : राज्यभरात (Maharashtra)भारतीय जनता पक्षाकडून(BJP) संघटनात्मक पुनर्बांधणी करण्यात येत असून, ज्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुखांचा कार्यकाळ संपला त्यांचे राजीनामे (Resignation) घेण्यात येत आहेत. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session)सुरू आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी घोषणा होईल, असं बोललं जात आहे.

दरम्यान, त्यानुसार भाजपचे पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (Mahesh Landge)यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad)भाजपला अधिवेशनानंतर नवा शहराध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra Politics : शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यावर हल्ला; ठाकरेंनी केली दरेकरांशी चर्चा

पुणे भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्याबरोबरच पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष लांडगे यांचा देखील कार्यकाळ संपला आहे. त्यामुळं प्रदेश भाजपाकडून आलेल्या संघटनात्मक सूचनांनुसार, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष लांडगे यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असे खात्रीलायक वृत्त आहे. राज्यात भाजपाकडून संघटनात्मक पुर्नबांधणी करण्यात येत असून, ज्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुखांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांचे राजीनामे घेण्यात येत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी घोषणा होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, 2017 मधील महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा पराभव केला होता. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर शहराध्यक्षपदाची धुरा आमदार लांडगेंकडे सोपवण्यात आली होती. आता त्यांचा शहराध्यक्ष पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन शहराध्यक्ष कोण होणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

लक्ष्मण जगताप आजारी असल्याने त्यांचे बंधू शंकर जगताप यांची चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर, आमदार लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाल्यावर महिन्याभरात पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना भाजपाची उमेदवारी मिळाली तेव्हा शंकर जगताप यांनी आपलं नेतृत्व कौशल्य दाखवत भाजपा विजय सोपा केला होता.

दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ‘जगताप पॅटर्न’मुळे निवडणूक जिंकली, असा दावा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राउत यांनी केला होता. त्यामुळे चिंचवडमध्ये भाजपाची नव्हे, तर जगताप कुटुंबियांची ताकद जिंकली, अशी चर्चा आहे. त्यामुळे शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदी ताकद देवून भाजपा पक्षश्रेष्ठी आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करणार, असे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube