कुंपणच शेत खातंय ! पोलिस अधिकारीच ‘एमडी’च्या रॅकेटमध्ये; उपनिरीक्षकाला बेड्या!

  • Written By: Published:
कुंपणच शेत खातंय ! पोलिस अधिकारीच ‘एमडी’च्या रॅकेटमध्ये; उपनिरीक्षकाला बेड्या!

Police Officer Involved in MD drugs Racket : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्सचे मोठे रॅकेट पुणे पोलिसांनी (Pune Police) उघडकीस आणले आहे. तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे एमडी (MD drugs) ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पुणे, दिल्लीसह इतर भागातून धडपकड करण्यात आली आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे तपासात समोर आले आहे. तर आता एका प्रकरणात पिंपरी चिंचवडमधील उपनिरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग आढळला आहे. निगडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास शेळके याला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे. त्याच्याकडे 45 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

‘तरीही अजितदादांना गृहखातं देणार नाही’, फडणवीसांच्या बारामतीकरांसमोर कोपरखळ्या

पुणे शहर व ग्रामीण भागात एमडी ड्रग्सचे मोठे साठे आढळून आले आहेत. त्यामुळे पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांकडून कारवाई सुरू आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिस आयुक्तांना ड्रग्जचे पाळेमुळे शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा अलर्ट मोडमध्ये काम करत आहे. शुक्रवारी पहाटेच्या वेळी पिंपळे निलख येथे सांगवी पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक कारवाई केली. नमामी शंकर झा (वय 32 ) याला पोलिसांनी अटक केली. तो मूळचा बिहारमधील असून, तो सध्या निगडी भागात राहतो. त्याच्याकडेही 2 कोटी रुपयांचे दोन किलो एमडी जप्त करण्यात आले.

अजितदादांसाठी पवारांची घालमेल; नजर खिळवून ठेवली तरी दादांनी…

झा याच्याकडे पोलीस चौकशी करत होते. त्यात झा याने धक्कादायक माहिती दिली. सांगवी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक विकास शेळके याचा थेट सहभाग असल्याचा उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली. त्यामुळे थेट अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी विकास शेळके याची चौकशी करण्यात आली. त्यात त्याच्याकडून 44 किलोची एमडी जप्त करण्यात आले असून, बाजारात याची किंमत 45 किटोपेक्षा अधिक आहे. शेळके याला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा शोधही पथकाकडून सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज