वादातील जमीनीवर थेट जेसीबी घेऊन जात ताबा; बाणेरमध्ये उद्योजक प्रकाश धारीवाल, मिलिंद कोठाडिया अन् प्रशांत मांडेकरांवर गुन्हा दाखल

possession of disputed land by entrepreneurs Prakash Dhariwal : बाणेरमध्ये वादातील जमिनीवर थेट ताबा मारणयाचा प्रयत्न केला गेला.

Possession Of Disputed Land By Entrepreneurs Prakash Dhariwal

possession of disputed land directly by JCB Filed a case against entrepreneurs Prakash Dhariwal, Milind Kothadia and Prashant Mandekar in Baner : पुण्यामधील बाणेर भागामध्ये एका वादामध्ये असलेल्या आणि न्यायालयामध्ये केस सुरू असलेल्या जमिनीवर थेट जेसीबी, टेम्पो घेऊन जात ताबा मारण्याचा प्रयत्न केला गेला. हा प्रकार उद्योजक प्रकाश धारीवाल, मिलिंद कोठाडिया अन् प्रशांत मांडेकरांकडून करण्यात आला असून या प्रकरणी  ताम्हाणे यांच्या तक्रारीवरून उद्योजक प्रकाश धारीवाल, मिलिंद कोठाडिया अन् प्रशांत मांडेकरांसह 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील औंध बाणेर डीपी रोडवर ओमकार ताम्हाणे यांचा आरोपींशी सुमारे एक एकर जमीनीवरून वाद सुरू आहे. याचं प्रकरण देखील न्यायालयात सुरू आहे. असं असताना न्यायालयाचा कोणताही आदेश न मिळता. या जागेवर मिलिंद कोठाडिया व प्रशांत मांडेकर यांनी थेट तब्बल वीस ते तीस महिला व पुरुष यांना या ठिकाणी आणले.

‘आम्हाला गृहीत धरू नका’ विधान परिषदेत जागा न मिळाल्याने आठवलेंची तीव्र नाराजी

या जमावाकडे जागेवर ताबा मिळवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य होतं. ज्यामध्ये जेसीबी, पत्रे, लोखंडी अँगल सिमेंट वाळू खडीचे तीन टेम्पो पत्रे लावण्याचे मशीन असं सगळं होत. त्यांनी कार घेऊन येत या जागेवर ताबा मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार करत असताना वादातील ताम्हाणे यांना माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी येत विरोध करण्याचा प्रयत्न केला.

सिंघम स्टाईल अन् आयपीएसची नोकरी सोडून अन्नामलाई भाजपमध्ये कसे आले? जाणून घ्या प्रवास

यामध्ये त्यांना थेट काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. त्यात त्यांचा तब्बल दीड लाखांचा महागडा फोन फोडण्यात आला. मात्र पोलिस तेथे पोहचताच त्यांनी जमावाला पांगवलं आणि संबंधित प्रकरणात उद्योजक प्रकाश धारीवाल, मिलिंद कोठाडिया अन् प्रशांत मांडेकरांसह 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us