Pune News : काळं फासायला जबाबदार कोण? नामदेव जाधव म्हणाले, राष्ट्रवादीच्या..

Pune News : काळं फासायला जबाबदार कोण? नामदेव जाधव म्हणाले, राष्ट्रवादीच्या..

Pune News : पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी (Pune News) आलेले लेखक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. या प्रकारानं एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर आता स्वतः नामदेव जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असून यासाठी कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नाही. तर शरद पवार (Sharad Pawar) आणि रोहित पवार यांना जबाबदार धरणार आहे. या दोघांची खासदारकी आणि आमदारकी रद्द करण्यासाठी मोठं पाऊल उचलणार आहोत. तसेच पहिल्या एफआयआरमध्ये पहिलं नाव शरद पवारांचं तर दुसऱ्यामध्ये रोहित पवारांचं नाव असेल, असे नामदेव जाधव म्हणाले.

या हल्ल्यानंतर नामदेव जाधव यांनी एक व्हिडिओ जारी करत आली भूमिका मांडली. पुण्यात मराठा आरक्षणाची भूमिका मांडत असताना आपल्यावर हा हल्ला झाला. हा माझ्यावरील नाही तर राज्यातील पाच कोटी मराठ्यांवरील हल्ला आहे. मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार असल्याचे कागदपत्र माझ्या हाती लागले होते. हे वास्तव असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ते पटलं नाही. त्यामुळेच माझ्यावर हल्ला करण्यात आला.

Sharad Pawar : ‘मी कुठेच नसलो तरी सगळीकडे, दुखण्याची नोंद घेतली’ शरद पवारांच्या निशाण्यावर कोण?

नेमकं काय घडलं होतं ?

पवारांवर आरोप करणारे नामदेव जाधव हे आज पुण्यात आले होते. त्यांचा आज भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम होणार होता. मात्र भांडारकर संस्थेने ती परवानगी नाकारली. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कार्यक्रमाला परवानगी देण्यात नाकारण्यात आल्याची माहिती आहे. यानंतर नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार भवनासमोर आले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पत्रकार भवनासमोर जमले होते. नामदेव जाधव बोलत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं. जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शाईफेक करून काळ फासलं. कार्यकर्त्यांना थेट जवळ जाऊन त्यांच्या तोंडाला शाई फासली. जाधव यांच्या सोबत सुरक्षारक्षक असतांनाही कार्यकर्त्यांनी जाधवांना काळं फासलं.

शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रात कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा शरद पवारांविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते त्यांच्याविरोधात आक्रमक झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार जिंदाबाद.. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो.. अशा घोषणा दिल्या.

पुण्यात नामदेव जाधवांना काळं फासलं, पवारांवर आरोप केल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?
पवारांच्या विरोधात ते वारंवार वक्तव्ये करत आहेत. आमच्यावर कारवाई केली तरी हरकत नाही. हा व्यक्ती शरद पवारांवर कायम टीका करत आहे. आरोप करत आहे. हे कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे. यापूर्वी हा व्यक्ती शरद पवारांच्या पाया पडायला यायचा. त्यांना पुस्तकं द्यायला यायचा. त्यामुळं शरद पवारांविरोधात या व्यक्तीनं वेडीवाकडं विधानं केलेली खपवून घेतली जाणार नाहीत, असं शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube