Ravindra Dhangekar : मिळकतकराच्या सवलतीनंतर धंगेकरांनी सांगितला नवा प्लॅन

Ravindra Dhangekar :  मिळकतकराच्या सवलतीनंतर धंगेकरांनी सांगितला नवा प्लॅन

कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी पुणेकरांना  मिळकतकरात जी 40 टक्के सूट मिळाली त्यावर भाष्य केले आहे. तसेच पुणे शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले आहे. तसेच यावेळी धंगेकरांनी बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे.

आमचा विजय बघून भाजपने हा कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही 500 स्क्वेअर फूट घरांसाठी देखील कर कमी करावा याची मागणी करणार असल्याचे धंगेतकरांनी म्हटले आहे. आगामी काळातील निवडणुकीनंतर पुणे महापालिकेमध्ये आमची सत्ता येईल, तेव्हा आम्ही आणखी नवे निर्णय घेऊ, असे धंगेकरांनी सांगितले आहे.

अफजलखान जसा महाराष्ट्रावर चालून आला तसे उद्धव ठाकरे खेडवर चालून आले; रामदास कदम यांचा हल्लाबोल

तसेच यावेळी त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.  माझ्या विजयाने त्यांचे डोळे उघडले आहेत, म्हणून भाजप आता जनतेचे कामे करणार आहे.  कसब्यामध्ये झालेल्या विजयाने त्यांनी कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेली 50 वर्षांपासून हा कर कमी होती. पण भाजप सत्तेत असताना त्यांनी हा कर वाढवण्याचे काम केले, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

‘अंधारेंना कुटुंबही सांभाळता आले नाही, त्यांची लायकी..’, देवयानी फरांदेंची जळजळीत टीका

तसेच राज्य सरकारने जुन्या वाड्यांसाठी एक बजेट दिले पाहिजे. त्यासाठी एक महामंडळ तयार करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शनिवार वाड्याच्या दुरूस्तीसाठी प्रयत्न करणार, त्यासाठी केंद्राकडे पत्र व्यवहार करुन हा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे धंगेकरांनी सांगितले आहे.

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube