Road Accident : पुण्यात कारने अनेकांना उडवलं; एक जागीच ठार, 4 जखमी
Road Accident: पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ (Road Accident) भीषण अपघाताची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत (Pune) असलेल्या एका कार चालकाने बेदरकारपणेक कार चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात एकाचा मृत्यू झाला तर आणखी तीन ते चार जण जखमी झाले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी या मद्यपान केलेल्या चालकासह त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. तर जखमी झालेल्या लोकांनी पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची थेट सीबीआय चौकशीच करा; आमदार बच्चू कडू यांची मागणी
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या थरकाप उडविणाऱ्या घटनेने पुणेकरांना पुन्हा एकदा संतोष माने घटनेची आठवण करून दिली. उमेश हनुमंत वाघमारे (48) असे वाहनचालकाचे नाव आहे. तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (44) असे वाहनाच्या मालकाचे नाव आहे. या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाहनचालक आणि त्याचा मित्र दोघांनीही मद्य प्राशन केले होते. तशाच अवस्थेत कार चालविली जात होती. कार अलका चौक मार्गावर आली असता वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याने पायी जात असलेल्या एका पादचाऱ्याला जाऊन धडकली. कार एवढ्यावरच थांबली नाही तर आणखी दोन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक देत एका विजेच्या खांबाला जाऊन आदळली. या घटनेत पायी जात असलेल्या नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी चार जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी येथे मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी गर्दीला पांगवत दोघा जणांना ताब्यात घेतले. तर या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होती.