Rupali Patil : धंगेकरांचा 10 हजारांच्या फरकानं विजय होईल

Rupali Patil : धंगेकरांचा 10 हजारांच्या फरकानं विजय होईल

पुणे : कसबा विधानसभा (Kasbah Assembly) पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasane) विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar ) अशी थेट लढत आहे. या मतमोजणीची पाच फेऱ्या संपल्या आहेत. सध्या सहाव्या फेरीसाठी मतमोजणी सुरू आहे. पाचव्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. सहाव्या फेरीतही रवींद्र धंगेककर यांनी ही आघाडी कायम राखली आहे. सहाव्या फेरीत धंगेकर यांना सहाव्या फेरीत २५ हजार ८९७ मते आहेत. तर भाजपचे रासने हे पिछाडीवर असून त्यांना २४ हजार ६२३ मते आहेत. धंगेकर यांनी घेतलेली आघाडी अत्यंत किरकोळ असून इतर फेऱ्यांमध्ये चित्र पालटण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये सध्या तरी धंगेकर आणि रासणे यांच्यात काँटे की टक्कर सुरू असल्याचं चित्रं आहे

https://www.youtube.com/watch?v=X1zSKzw9xnQ

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटीलं यांनी सांगितलं रवींद्र धंगेकरांचा १० हजारांच्या फरकाने विजय होईल, असा दावा केला. पाटील यांनी सांगितलं की, कसब्याच्या मतदारंनी ठरवलं की, ते कामाच्याच माणसाला विजयी करतील. त्यामुळे रवींद्र धंगेकर नक्की विजयी होतील. आणि ते तब्बल दहा हजारांच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास रुपाली पाटील यांनी व्यक्त केला.

तर रवींद्र धंगेकर यांनीही माझा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. खरंतर ज्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच माझा विजय निश्चित झाला होता. परंतु निवडणूक प्रक्रिया असल्याने सोपस्कार पार पाडावे लागले असेही रवींद्र धंगेकर यांनी म्हंटलं आहे. धंगेकर यांनी 15 हजार मतांच्या फरकाने माझा विजय निश्चित होणार असल्याचे सांगून टाकलं आहे.

Kasba By Election : भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर

भाजपच्या उमेदवार हेमंत रासने यांनीही यापूर्वीही विजय माझाच होणार असा दावा केला आहे. त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube