महापौर असताना पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा अन्..,; धंगेकरांचा मोहोळांवर नवा बॉम्ब…

मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची इनोव्हा क्रिस्टा गाडी वापरत होते, असा आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे.

Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीनीच्या व्यवहारासंदर्भात शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यात चांगलीच जुंपल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एकीकडे मंत्री मोहोळ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले तर दुसरीकडे आता रविंद्र धंगेकरांनी एक मोठा नवा बॉम्बच टाकलायं. फेसबुक पोस्ट शेअर करीत मुरलीधर मोहोळ आणि बिल्डर बढेकर यांच्यातील संबंधांचा थेट पुरावाच धंगेकरांनी दिला आहे. मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर यांची इनोव्हा क्रिस्टा गाडी वापरत होते, असा दावा धंगेकरांकडून करण्यात आलायं.

मुरलीधर मोहोळ खासदार होण्याआधी पुण्याचे महापौर होते. ते महापौर असताना पुणे महापालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरत होते. त्या गाडीचा नंबर MH12 SW 0909…असा होता. ही गाडी मोहोळ यांची नाही, पुणे महापालिकेचीही नाही, तर ही गाडी होती कोथरुडचे बिल्डर बढेकर यांची. तेच बढेकर ज्यांनी जैन बोर्डिंग खरेदीसाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि मुरलीधर मोहोळ यांचे ते पार्टनर झाले, असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकर यांनी केलायं.

पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का..? साडेनऊ हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता नाही आली का..? या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले..? विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत, असं धंगेकरांनी सांगितले.

follow us