सचिन सानप यांना शिवसेनेचा जाहिर पाठिंबा; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Sachin Sanap : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आला आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेने अपक्ष

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Sachin Sanap

Sachin Sanap : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आला आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही घोषणा केली. काही ठिकाणी अपवाद आहेत, असे सांगत शिंदे यांनी सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे (Kaustubh Gavde) हे रिंगणात आहेत. त्या आधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांनी माघार घेतली होती. मात्र, अमरावतीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपच्या (BJP) बंडखोरांचे मोठे आव्हान आहे. त्याचे पडसाद आता पुण्यात उमटले असून शिंदेंच्या शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप (Sachin Sanap) यांना पाठिंबा दिला आहे. मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, आम्ही महायुती म्हणून एकत्रित ही निवडणूक लढवत आहोत. पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आमचा पाठिंबा सचिन सानप यांना आहे. महायुती म्हणून लढत असलो तरी काही ठिकाणी अपवाद आहेत, काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल. पण पाचही जागा या महायुतीच्या निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.

व्यवसायात मिळणार यश; आज ‘या’ राशींना होणार आर्थिक फायदा –

निवडणूक प्रक्रिया तारीख
अधिसूचना प्रसिद्ध 29 सप्टेंबर 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2026
अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2026
मतदान 23 ऑक्टोबर 2026
मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4
मतमोजणी व निकाल 27 ऑक्टोबर 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी

follow us