मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम
नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Social activities for students initiated by Sunny Vinayak Nimhan : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित करणे आणि पारंपरिक हस्तकलेची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने कै.इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय,औंध आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बोपोडी येथे मोफत आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेत प्रशिक्षक चारुदत्त वाईडकर यांनी आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक आकाशकंदील तयार करत हस्तकलेचा आनंद घेतला. आर्थिक परिस्थितीचा विचार न करता प्रत्येक मुलाला अशा उपक्रमांमध्ये सहभागी होता यावे आणि त्यांना प्रत्यक्ष कृतीतून नवीन कौशल्ये शिकता यावीत, हा या कार्यशाळेमागील सामाजिक दृष्टिकोन होता.
अमित शहा यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीत मतभेद असल्याचे वृत्त निराधार; उमेश पाटील यांचा खुलासा
यावेळी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “प्रत्येक मुलामध्ये काही ना काही वेगळे कौशल्य आणि प्रतिभा दडलेली असते. गरज असते ती केवळ योग्य संधी आणि प्रोत्साहनाची! आर्थिक परिस्थिती किंवा इतर कोणत्याही मर्यादांमुळे मुलांच्या कल्पकतेला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अशा मोफत उपक्रमांचे आयोजन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. मुलांच्या हातांना कौशल्य, विचारांना दिशा आणि स्वप्नांना बळ देणे, हाच आमच्या उपक्रमांचा खरा उद्देश आहे. आजच्या मुलांमध्ये उद्याचा सक्षम समाज घडविण्याची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत कला, संस्कृती आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर आमचा विशेष भर राहील.”
या प्रसंगी माजी नगरसेविका शैलजाताई खेडेकर,पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य अमित मुरकुटे,माजी स्वीकृत नगरसेवक वसंत जुनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील रानवडे, मधुरा निम्हण,विशाल उंडे, ज्येष्ठ नागरिक जमदाग्नी भास्कर,माजी शिक्षक व शिक्षण केंद्रप्रमुख आत्माराम जाधव,रमेश जुनवणे, प्रदीप खेडेकर, संजय मांजिरे, अमर खंडागळे, देवा रेड्डी, उमेश वाघ आणि विशाल बहिरट यांच्यासह विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अमित शाहांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ दिल्लीत, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटलांच्या मंत्रिपदाची चर्चा!
या कार्यशाळेच्या नियोजनासाठी वैशाली पोतदार, पूजा चोंधे, पूजा वाघमारे, नचिकेत राऊत यांच्यासह गणेश शेलार आणि बाळासाहेब बानगुडे यांनी घेतलेली मेहनत आणि केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच पारंपरिक कलेचे जतन आणि सर्वसमावेशक सहभागाचा संदेश देणारी ही कार्यशाळा औंध-बोपोडीकरांसाठी आनंददायी ठरली.