बारामतीचं राजकारण तापलं; भाजपची ताकद, NCP चे डावपेच…युगेंद्र पवार काय म्हणाले?

श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गट पूर्ण ताकदीने रिंगणात उतरणार असल्याचे संकेत युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिले आहेत.

Yugendra Pawar

Someshwar Sugar Factory Election : बारामतीचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे भाजपने ताकद लावलेली असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षानेही कसर सोडली नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निंबूतमध्ये झालेल्या बैठकीत युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी खळबळ उडवून दिलीयं. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष पूर्ण ताकदीने रिंगणात उतरणार असल्याचे संकेत युगेंद्र पवार यांनी दिले आहेत.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी युगेंद्र पवार यांनी निंबूतमध्ये बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. निवडणूक पूर्ण ताकदीने लढवावी, असं सभासदांसह कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. त्यावर पुढील आठवड्यात पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय.

पुढे बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, तीन दिवसांपूर्वीच सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले. सभासदांसह कार्यकर्त्यांच्या अपेक्षा समजून घेणे आवश्यक होते. आजची बैठक ही केवळ प्राथमिक चर्चा आणि मते जाणून घेण्यासाठी होती. कार्यकर्त्यांचा कौल लक्षात घेऊन पुढील आठवड्यात रणनीती आणि पक्षाची अंतिम भूमिका जाहीर केली जाणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय. ​आता सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून ताकद लावली जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये युती अथवा आघाडीची शक्यता, याबाबत विचारले असता युगेंद्र पवार यांनी सावध भूमिका घेतली.

एमपीएससी अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्यासाठी परीक्षार्थी रस्त्यावर; दिपकेंसह मविआचा आंदोलनाला पाठिंबा

​सध्या ही केवळ सुरुवातीची चर्चा आहे. आजची बैठक ही पहिलीच बैठक होती. प्रमुख कार्यकर्ते आणि सभासदांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीला कोणत्या पद्धतीने सामोरे जायचे, तसेच पुढील रणनीती काय असणार, याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवडाभरात घेतला जाईल असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

follow us