पुण्यात खळबळ! रँगिग गँगचा धुमाकुळ, कोल्हापूरचा विद्यार्थ्यी 15 दिवसांपासून बेपत्ता

बी. जे. मेडिकल कॉलेजकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आलीय.

News Photo   2026 07 31T192007.217

पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या (Pune) विद्यार्थ्यांकडून रँगिगचे प्रकार सुरु असल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये एम. बी. बी. एस. च्या पहिल्या वर्षाला शिकणारा तन्मय वंगे नावाचा विद्यार्थी रॅगिंगला कंटाळून गेले चौदा दिवस होस्टेल सोडून निघून गेला आहे.

उत्कर्ष सिंग , श्रेया यादव आणि त्यांच्या गृप कडून तन्मयला सतत त्रास दिला जात होता. त्याच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरुन त्याला हिणवलं जात होतं. त्यामुळे तो निघून गेल्याची तक्रार यन्मयचे वडील अजयकुमार वंगे यांनी पोलिसांकडे आणि बीजे मेडिकल कॉलेजकडं केली.

वैद्यकीय शिक्षणासाठी बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून त्याला त्रास दिला जात होता. 18 जुलैला तन्मय नातेवाईकांकडे जातोय असं सांगून होस्टेलमधून निघाला. पुणे रेल्वे स्टेशनवर तो सोलापुरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसल्याच सी सीटीव्हीमध्ये दिसतं आहे. मात्र, लोणीकंद रेल्वे स्टेशन नंतर त्याचा फोन बंद झाला. त्यानंतर 21 आणि 23 जुलैला त्याच्या मोबाईल मधील इंटरनेट सुरू झाल्याच तपास करणाऱ्या पोलfसांचं म्हणणं आहे. मात्र त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

बी. जे. मेडिकल कॉलेजकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आलीय. मात्र त्या चौकशीत काय आढळलं आहे याची माहिती आपल्याला दिली जात नसल्याचं तन्मयच्या वडिलांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर इतरही अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा त्रास होत असल्याचं म्हटलंय असं तन्मयच्या वडिलांनी सांगितलं आहे.

तन्मय निघून गेल्याने त्याचे आई वडील तणावात असून त्याच्या आईला रुग्णालयात भरती करावं लागलं आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवर रॅगिंगचे प्रकार नेहमीच समोर येतात. मागीलवर्षी बी. जे. मेडिकल कॉलेजमधील तीन निवासी डॉक्टरांना अन्य एका निवासी डॉक्टरचे रॅगिंग केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं होतं.

तन्मयचे वडील काय म्हणाले?

अजयकुमार वंगे यांनी याबाबत एबीपी माझा सोबत बोलताना त्यांनी तन्मय यानं मागील सुट्टीत आल्यानंतर सांगितलं होतं की कॉलेजमधील स्थानिक मुलं त्रास द्यायचे. कॉलेजमध्ये तक्रार देऊया असं सांगितल्यावर चार वर्ष काढायची असल्यानं तसं काय करायला नको. 31 तारखेला सुट्टी लागणार आहे, तुम्ही या तुमच्यासोबत येतो असं तन्मयनं सांगितलं होतं. मात्र, 18 जुलै पासून तो गायब झाला आहे. सहा- सव्वा सातपासून मोबाईल स्विच ऑफ झाला आहे.

तन्मयनं शालेय जीवनातील मित्र हर्षवर्धन चव्हाण याच्याकडे जाऊन रँगिंगमुळं झालेल्या त्रासाची माहिती दिली होती, असं अजयकुमार वंगे यांनी सांगितलं. हर्षवर्धन चव्हाणला तन्मयने काकाकडे जाणार असल्याचं सांगितल्याचं अजयकुमार वंगे म्हणाले. तन्मय निघून गेल्यानं त्याच्या आईला दवाखान्यात दाखल करावं लागल्याचं सांगताना अजयकुमार वंगे भावनिक झाले होते.

तन्मय वंगे हा कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील आहे. ग्रामीण भागात त्यानं बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. नीट परीक्षेत त्याला 550 पेक्षा अधिक मार्क्स मिळाल्यानं पुण्यातील शासकीय बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळाला होता. तन्मयच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रँगिंगमुळं त्याला त्रास होत होता. होस्टेलमधून जाताना काकांकडं न जाता तो सोलापूरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं होतं. बी.जे. मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एकनाथ पवार यांनी कमिटी काम करत असून त्यानंतर तुम्हाला सांगू असं उत्तर दिलं आहे.

follow us

संबंधित बातम्या