पुण्यात खळबळ! MMCC महाविद्यालयातील विद्यार्थ्याची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या

  • Written By: Published:
पुण्यात खळबळ! MMCC महाविद्यालयातील विद्यार्थ्याची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या

MMCC Law Student Commit Suicide : शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डेक्कन परिसरातील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने रॅगिंगल वैतागून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  विद्यार्थ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍याविरूध्द चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sanjay Raut : त्यांनी वकिली केली, पण कायद्याची पुस्तकं पुन्हा चाळायला हवी, राऊतांचा फडणवीसांना टोला

राज रावसाहेब गर्जे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, राजचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे यांनी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार निरूपम जयवंत जोशी याच्याविरूध्द आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज आणि निरूपम यांची ओळख होती. निरूपम हा कोणत्यातरी कारणावरून राज यास मानसिक त्रास देत होता. वेळोवेळी होणार्‍या त्रासाला कंटाळून राजने गळफास घेत आत्महत्या केली.

Video : अखेर अजितदादांनी वचपा काढलाचं; म्हणाले, इथं रडण्यापेक्षा…

दरम्यान, पुण्यामध्ये राज्यातील विविध शहरातून तसेच देश-विदेशातून लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. यादरम्यान काहीजण हॉस्टेलमध्ये वास्तव्य करतात. मात्र, यादरम्यान अनेक महाविद्यालयांच्या हॉस्टेमध्ये अनेक विद्यार्थांना वरिष्ठ विद्यार्थांच्या जाचाला सामोरे जावे लागल्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. आजच घटनाही त्यातीलच एकप्रकारे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube