Dagdusheth Ganpati : यंदाही दुपारी चार वाजता निघणार दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक…
Dagdusheth Ganpati : यावर्षी देखील दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Ganpati) मंडळाने पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. गेल्या वर्षी मंडळाने मोठा निर्णय घेत वर्षानुवर्षे वर्षे चालत आलेल्या परंपरेला फाटा देत दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणूक काढली होती.
यापूर्वी रात्री उशिरा मिरवणूकीला सुरुवात होत होती त्यामुळे अनेक गणेश भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी तासनतास ताटकळत राहावं लागत होतं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बाप्पाची आगमन तसेच विसर्जन मिरवणूक कशी असेल, किती वाजता निघेल त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठा सोहल्याविषयी माहिती मंडळाने दिली.
गणेश चतुर्दशीच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे असल्याची माहिती मंडळाने दिली आहे. तसेच यावर्षी मंडळातर्फे हिमालयातील जटोली शिवमंदिरची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्या मंदिरात कर्नाटकातील श्री दत्त संप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते गणेश चतुर्थीला सकाळी 11:11 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषिपंचमीनिमित्त बाप्पा समोर 31 हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्षक पठण होणार आहे. गणेशोत्सव काळात गणेश भक्तांसाठी 50 कोटींचा विमा मंडळातर्फे उतरवण्यात येणार आहे असल्याची देखील माहिती मंडळाने दिली आहे.
सुरक्षेसाठी मांडव परिसरात 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे तसेच मांडवापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या गणेश भक्तांसाठी विविध ठिकाणी चार मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत तसेच भक्तांसाठी समाज माध्यमांवर देखील 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
PM Modi : मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
बाप्पाची मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून निघणार आहे. आगमनासाठी सिंह रथ तयार करण्यात येत असल्याची देखील माहिती या पत्रकार परिषदेमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने दिली.