Ashok Chavan : कसब्यात मतदारांनी पैशांची दडपशाही झुगारली…

Ashok Chavan : कसब्यात मतदारांनी पैशांची दडपशाही झुगारली…

पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकरांच्या विजयासाठी मतदारांनी सत्ता व पैशाची दडपशाही झुगारून लावली असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. काँग्रेसने कसबा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतल्यानंतर राज्यातील नेत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच धंगेकरांचा विजय महाविकास आघाडीची एकजूट आणि नेते पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचा विजय असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी म्हटंलय. त्यासोबतच आमदार रविंद्र धंगेकरांच्या विजयासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आभारही मानलं आहे.

चव्हाण म्हणाले, कसब्यातला जनमताचा हा कौल भाजपविरोधात आहे. हा जनशक्तीचा धनशक्तीवर विजय आहे. हा निकाल महाराष्ट्रातील वातावरण बदलल्याचे संकेत आहेत. काँग्रेस पक्षाने लोकप्रिय व सक्षम उमेदवार दिला होता, त्यामुळेच धंगेकरांचा विजय झाल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

तसेच आमदार रविंद्र धंगेकरांच्या विजयासाठी मतदारांनी सत्ता व पैशाची दडपशाही झुगारून लावली. नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि विजयासाठी परिश्रम घेणार्‍या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मतदारांचे आभार, असंही ते म्हणाले आहेत.

हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार सातत्याने निवडून येत होता. यंदा मात्र काँग्रेसने ही परंपरा बदलून टाकली आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीने भाजपकडून हिसकावून घेतला आहे.

संजय राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग : शरद पवारांनी त्रुटींकडे वेधले लक्ष

कसबा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर रोड शो करीत कसबा हा हिंदुत्ववादी मतदारसंघ असून इथून काँग्रेसचा उमेदवार निवडूनच येणार नसल्याचं भाकीत केलं होतं.

मात्र, निवडणूक निकालानंतर अखेर देवेंद्र फडणवीसांचं भाकीत खोटं ठरलं आहे. कसबा हा हिंदुत्वावादी नाही तर पुरोगामी विचारांचा असल्याचं काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकरांनी दाखवून दिलं आहे.

Chinchwad Bypoll Election Result : “कसबा आणि चिंचवडचा निकाल हा लोकशाहीच्या बाजूने लागणार”, रोहित पवारांचा विश्वास

पोटनिवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 11 हजार 40 मतांनी विजयी झाले आहेत.

आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच धंगेकरांनी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. सुरुवातीच्या मतमोजणीत फारशी आघाडी नव्हती. त्यानंतर आघाडी वाढत गेली. दहाव्या फेरीनंतर अखेर धंगेकरांच्या समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube