माजी आमदार मोहितेंच्या पाडावासाठी खेडमध्ये विरोधकांनी कंबर कसली
PDCC Bank Election: जिल्हा बँकेच्या संचालकांची निवड करणाऱ्या एकूण खेड तालुक्यातील 104 मतदार प्रतिनिधींच्या निवडीमध्ये मोहिते पाटील गटाचं वर्चस्व आहे.
PDCC Bank Election: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank) निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभव, नगरपालिका निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे राजकारणात कमबॅक करण्यासाठी दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी कंबर कसली आहे. परंतु मोहितेंना आणखी एक धक्का देण्यासाठी विरोधक एकवटले आहेत.
जिल्हा बँकेच्या संचालकांची निवड करणाऱ्या एकूण खेड तालुक्यातील 104 मतदार प्रतिनिधींच्या निवडीमध्ये मोहिते पाटील गटाचं वर्चस्व आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे बाबाजी काळे आणि अतुल देशमुख यांना मानणारे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने निवडून आले हेत. त्यामुळे आता खेडमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार की विरोधक एकत्र येणार? याची उत्सुकता वाढलीय.
Pune BJP : मोहोळांच्या बैठकीनंतर भाजपमध्ये पुन्हा धुसफूस? बिडकरांच्या बैठकीने चर्चांना उधाण
मोहिते पाटलांविरोधात पुन्हा ‘वज्रमूठ’?
खेडच्या राजकारणाचा इतिहास जरा वेगळाच आहे. दिलीप मोहिते यांचे राजकीय वर्चस्व वाढताना दिसलं की त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन त्यांना जोरदार धक्का देतात. दोन विधानसभा निवडणुकीत तसं घडलं होते. 2014 मध्ये दिवंगत आमदार सुरेश गोरे यांना विविध पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे दिलीप मोहिते पाटील यांना पराभवाचा मोठा झटका बसला होता. या विधानसभा निवडणुकीत तसेच चित्र होते. बाबाजी काळे यांच्या मागेही विरोधकांनी ताकद उभी राहिले. त्यामुळे मोहिते यांना पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणजेच सर्व पक्षीय विरोधक एकत्र आले की मोहिते पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होतो, असे राजकीय गणित आहे. तिरंगी लढत झाली तर मोहिते पाटील हे पुन्हा आमदार होतात, हे 2019 च्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढती टाळून विरोध एकत्र येण्याची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र सहकार क्षेत्रात मोहिते पाटील यांची असलेली पकड पाहता, त्यांच्यासमोरचं आव्हान उभं करणं सोपं नसेल, असंही राजकीय चित्र आहे.
धार्मिक उपक्रमांसह सामाजिक बांधिलकीही; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा शिबिराचा उपक्रम…
अमोल पवारांच्या पुनरागमनाने समीकरणं बदलणार?
विधानसभा निवडणुकीत उमेदवारीपासून दूर राहिल्यानंतर अमोल पवार यांनी आपल्या गावातील विकास सोसायटीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येत पुन्हा राजकीय सक्रियता दाखवली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बाबाजी काळे आणि अमोल पवार हे दोघेही उमेदवारीच्या शर्यतीत होते. अखेर बाबाजी काळे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अमोल पवार कोणती भूमिका घेतात, याकडे खेड तालुक्याचं लक्ष लागलं आहे. जिल्हा बँक निवडणुकीत खेडच्या राजकीय नवीन समीकरण उदयास येऊ शकते.