ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा धक्का, स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; इंग्लंडविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

Usman Khawaja Retirement :  ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध

Usman Khawaja Retirement

Usman Khawaja Retirement :  ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेसच्या (Ashes Series) शेवटच्या आणि पाचव्या कसोटी सामना त्याचा शेवटाचा सामना असणार असल्याची माहिती त्याने पत्रकार परिषदेत दिली आहे. उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू उस्मान ख्वाजा (Usman Khawaja Retirement) पत्रकार परिषदेत म्हणाला, हे कठीण होते. मला फक्त सर्वांना सांगायचे होते. मी माझ्या संघातील खेळाडूंना लगेच सांगितले. मी भावनिक होण्याची अपेक्षा केली नव्हती, परंतु मी लगेच रडू लागलो आणि स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागले. शेवटी मी स्वतःला सावरले आणि मला जे म्हणायचे आहे ते बोललो. निवृत्त झाल्यावर मी रडेल असे मला कधीच वाटले नव्हते, पण मी लगेच रडलो. ते माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे दर्शवते. माझा प्रवास ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटूंपेक्षा वेगळा आहे. असं पत्रकार परिषदेत ख्वाजा म्हणाला. तसेच मी एक अभिमानी मुस्लिम मुलगा आहे. मला सांगण्यात आले होते की मी कधीही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी खेळणार नाही. आता माझ्याकडे पहा. असेही तो म्हणाला.

गाजर दाखवला अन् शहराध्यक्षांना कार्यालयात डांबून ठेवलं; नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक

उस्मान ख्वाजाची शानदार कारकीर्द

उस्मान ख्वाजाने त्याचे बहुतेक सामने सलामीवीर फलंदाज म्हणून खेळले आहेत. ख्वाजाने आतापर्यंत 87 कसोटी सामन्यांमध्ये 43.39 च्या सरासरीने 6206 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 16 शतके आणि 28 अर्धशतके आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 232 आहे. 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये, उस्मानने 42 च्या सरासरीने 1554 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 2 शतके आणि 12 अर्धशतके आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 84.09 आहे. टी20 मध्ये, ख्वाजाने 9 सामन्यांमध्ये 26.77 च्या सरासरीने 241 धावा केल्या आहेत.

follow us