कुस्तीपटूंच्या उपोषणादरम्यान क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय

कुस्तीपटूंच्या उपोषणादरम्यान क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय

Wrestling Federation Elections: क्रीडा मंत्रालयाने (Ministry of Sports)भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीवर बंदी घातली आहे. पुढील महिन्यात या निवडणुका होणार होत्या. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा जंतरमंतरवर (Jantar Mantar) धरणे आंदोलन (Dharna movement)सुरू केलं असतानाच हा निर्णय घेतला आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) एक समिती स्थापन करणार असल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. ही समिती 45 दिवसांत कुस्ती महासंघाची निवड करेल. IOA समिती खेळाडूंची निवडही करेल आणि फेडरेशनच्या दैनंदिन कामकाजावरही लक्ष ठेवेल.

Narendra Modi : पाकिस्तानी पण म्हणाले; मोदी है तो मुमकीन है

आज (दि.24) कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात धरणे धरणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विनेश फोगटसह सात कुस्तीपटूंनी आपल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाकडे ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी कुस्तीपटूंचे वकील सरन्यायाधीशांसमोर सुनावणीची मागणी करणार आहेत.

यादरम्यान, दिल्ली पोलिसांनी निरीक्षण समितीच्या तपासाबाबत क्रीडा मंत्रालयाकडून स्थिती अहवाल मागवला आहे. यंदा जानेवारी महिन्यात क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी कुस्तीपटूंशी चर्चा करुन 6 सदस्यीय निरीक्षण समिती स्थापन केली होती. मेरी कोमला या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. ही समिती भारतीय कुस्ती महासंघाच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवायची.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube