Sanju Samson : संजू सॅमसन भारतीय संघातून बाहेर का? बीसीसीआयने दिले धक्कादायक कारण
Sanju Samson : झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात टी20 विश्वचषक
Sanju Samson : झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेचा हिरो संजू सॅमसनचा समावेश करण्यात न आल्याने सोशल मीडियावर क्रिकेट चाहते तसेच माजी खेळाडू बीसीसीआयवर जोरदार टीका करताना दिसत आहे. आयर्लंडविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत आणि सध्या सुरु असणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू फलंदाजीत फ्लॉप ठरल्याने त्याला झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून बाहेर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका अहवालाद्वारे संजू सॅमसनला वगळण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, निवडकर्त्यांना झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) युवा खेळाडूंना संधी द्यायची होती. जरी संजू सॅमसन (Sanju Samson) संघात असता तरी त्याला या दौऱ्यात खेळण्याची संधी मिळाली नसती. संजू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघाचा भाग आहे आणि त्याच्या वर्कलोड लक्षात घेऊन त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे संजू गेल्या तीन टी20 सामन्यात फलंदाजीत फ्लॉप ठरला आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याने केवळ 5 धावा केल्या आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात तो अवघ्या एका धावेवर बाद झाला होता.
झिम्बाब्वे मालिकेसाठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).
राज्यात आज धो धो पाऊस; ‘या’ सहा जिल्ह्यांतील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
झिम्बाब्वेविरुद्धची मालिका कधी होणार?
भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये तीन टी20 सामने खेळले जातील. या मालिकेतील तिन्ही सामने हरारे येथे 23, 25 आणि 26 जुलै रोजी होणार आहे.